शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपात महिला व युवकांचा सहभाग हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:34 IST

देशातील २२ राज्यांमधील १२८ गावांमध्ये १ ते १० जून या कालावधीत शेतकऱ्यांचा संप होणार आहे. या संपात महिला शेतकरी व युवकांचा सहभाग असायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ शेती तज्ज्ञ व महाराष्ट्र सुकाणू समितीचे सदस्य डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देबुधाजीराव मुळीक यांचा ‘लोकमत’शी मुक्त संवाद

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील २२ राज्यांमधील १२८ गावांमध्ये १ ते १० जून या कालावधीत शेतकऱ्यांचा संप होणार आहे. या संपात महिला शेतकरी व युवकांचा सहभाग असायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ शेती तज्ज्ञ व महाराष्ट्र सुकाणू समितीचे सदस्य डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केली आहे. अलीकडेच सेवाग्राम येथे या नियोजित संपाच्या आयोजनाबाबत राष्ट्रीय किसान महासंघाची राष्ट्रीय परिषद झाली. यात सहभागी होण्यासाठी मुळीक आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी मुक्त संवाद साधला.डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी ज्या काही गोष्टी शासनाला करायच्या आहे वा शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मागायच्या आहे, त्यासाठी कायदा निर्माण झाला पाहिजे. कायदा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. कर्मचाऱ्यांना जसा प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग लागू करावा लागतो. राज्य घटना निर्माण झाली त्यावेळीच घटनेत तशी तरतूद करण्यात आली. तत्कालीन ब्युरोकशीने ही व्यवस्था निर्माण करून घेतली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावाच लागतो. हीच पद्धती शेतकऱ्यांसाठी असायला हवी. शेतकऱ्यांना पेन्शन, हमी भाव या बाबी कायद्यात रूपांतर करून मिळायला हवा, तो त्यांचा हक्क आहे, असे डॉ. मुळीक म्हणाले. अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खासदारांना आम्ही निश्चितपणे पगारवाढ देऊ, असे जाहीर केले आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने शेतकऱ्यांसाठीही कायदेशीर तरतूदी व्हायला हव्या, अशी भूमिका आपण या परिषदेच्या निमित्ताने मांडली.विदर्भात तापमान प्रचंड वाढत आहे. अशा स्थितीत शेतमाल जगविणे कठीण काम आहे. मी नागपूर ते सेवाग्राम प्रवासादरम्यान सर्वत्र परिस्थिती पाहिली. कुठेही पाणी दिसत नाही. शेत रिकामे पडलेले आहे. झाडे राहिलेले नाही. विकासाच्या नावावर केवळ सिमेंट आणि डांबर याचे जंगल उभे करण्याचे काम सुरू आहे. हे वाढते तापमान शेती व्यवस्थेला अतिशय हानीकारक आहे. शेतकऱ्यांसाठी तापमानावर मात करणाऱ्या व्यवस्था निर्माण कराव्या लागणार आहे. ही स्थिती कायम राहिल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तरी या भागातील शेतकरी काही सुखी होणार नाही. गतवर्षी मी नागपुरात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री विदर्भाचा, वित्तमंत्री विदर्भाचा, उर्जामंत्री विदर्भाचा, केंद्रीय मंत्री विदर्भाचे या सर्वांकडून एकदा संपूर्ण विकासाचे काम विदर्भासाठी होऊन जाऊ द्या, असे म्हणालो होतो. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांचा विकास हा शाश्वत स्वरूपाचा व्हायला हवा, असेही ते म्हणाले. विदेशांमध्ये येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहे. अशा व्यवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला हव्या. त्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती दुरूस्त होणार नाही. आज आपल्याकडे अशा स्वरूपाच्या व्यवस्था तयार नाही. यामुळे अस्मानी, सुल्तानी संकटात शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडतो.