शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

महिला व विद्यार्थिनींनी रॅलीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

By admin | Updated: February 13, 2016 01:42 IST

विविध सामाजिक संघटना, महिला मंडळी, विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागात शहरातून ‘नो व्हेईकल डे’ रॅली काढण्यात आली.

नो व्हेईकल डे : महिलांचा प्रथमच सहभागआर्वी : विविध सामाजिक संघटना, महिला मंडळी, विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागात शहरातून ‘नो व्हेईकल डे’ रॅली काढण्यात आली. यात प्रथमच महिलांनी सहभागी होत आर्वीकरांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. स्थानिक पावडे हॉस्पिटल येथून शुक्रवारी सकाळी ९ वाजता ‘नो व्हेईकल डे’ ची रॅली निघाली. यातून जनजागृतीची करण्यात आली. यात आर्वीतील संत निरंकारी सत्संग मंडळ व राधास्वामी सत्संग मंडळाच्या महिलांनी स्वत: सायकल चालवून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा संदेश दिला. यावेळी नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती. ही रॅली विश्रामगृह परिसर, आठवडी बाजार मार्गे, पुरुषमलय चौक, गुरूनानक धर्मशाळा येथून गांधी चौक, शिवाजी चौक या मार्गाने निघाली. रॅलीत ‘नो व्हेईकल डे’ कृती समितीचे डॉ. अरूण पावडे, इंडियन मेडिकल असोसिएशन, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, इंडियन रेडक्रॉस असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. कृषक व मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, शिक्षकांनी सहभाग घेतला. समारोप प्रसंगी ‘नो व्हेईकल डे’ बाबतची भूमिका सत्संग मंडळाचे रवी मंछानी व कविता बुधवानी यांनी विषद केली. समारोपाचे संचालन व आभार प्रा. अभय दर्भे यांनी केले. पुढील शुक्रवारी लायन्स क्लबच्यावतीने ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.(तालुका प्रतिनिधी)