शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती भांडणातून युवतीने जाळून घेतले

By admin | Updated: February 12, 2017 00:59 IST

अंबिकापूर येथील २२ वर्षीय युवतीने घरगुती भांडण झाल्याने जाळून घेतले.

अंबिकापूर येथील घटना : उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू आष्टी (शहीद) : अंबिकापूर येथील २२ वर्षीय युवतीने घरगुती भांडण झाल्याने जाळून घेतले. यात ती ८५ टक्के जळाल्याने तिचा अमरावती येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियंका रावसाहेब केचे (२२) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी घडली प्रियंका हिच्या लग्नासाठी पाहुणे पाहणे सुरू होते. तिची वहिनी तिच्या आईसोबत नेहमी भांडण करायची. आईला झालेला त्रास पाहुन प्रियंका दुखी व्हायची. कलह वाढल्याने गुरुवारी दुपारी ३.३० वाजता घरी अंगावर रॉकेल ओतुन जाळून घेतले. यामध्ये ती ८५ टक्के जळाल्याने गंभीर अवस्थेत मोर्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तात्काळ अमरावती येथील इर्विन हॉस्पीटल मध्ये भरती केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटना गुरुवारी (२ फेब्रुवारी) घडली. मात्र डायरी अमरावती पोलीस ठाण्यात होती. आष्टी पोलीस ठाण्याला आजपासून कारवाईसाठी डायरी मिळाली. याप्रकरणी ठाणेदार दिलीप ठाकूर, जमादार दिक्षीत तपास करुन पुढील कारवाई करणार आहे. प्रियंका हिने मृत्यूपूर्वी एका डायरीत सविस्तर घटना लिहून ठेवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली असून अद्याप काहीही जप्त करण्यात आले नाही. त्या डायरीत नेमके काय आहे, हे तपासाअंती कळणार आहे. घरगुती भांडण एका युवतीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरल्याने तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. सदर घटना घडली तेव्हा घरातील सर्वजण शेतात गेले होते. त्यामुळे प्रत्यक्षदर्शिना वस्तुस्थिती माहिती नाही. पोलीस पुढील तपास करीत आहे. सदर घटना २ फेबु्रवारीला घडली. मात्र आष्टी ठाण्यात चौकशीसाठी प्रकरण शनिवारी प्राप्त झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)