वर्धा : दारूबंदी असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. दारूविक्रेत्या महिला, विद्यार्थ्यांना यापूर्वी दारूची वाहतूक करताना अटक झाली आहे; आता दोन युवतींना दारूची तस्करी करताना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई येळाकेळी मार्गावर मंगळवारी दुपारी सेलू पोलिसांनी केली.किरण मनोज पवार रा. बाभूळगाव व भारती विजय वातिले रा. वर्धा अशी आरोपींनी नावे आहेत. दुचाकी (एमएच ३२ एबी ५७७३)ने ५२ हजार २०० रुपये किमतीच्या ३६ विदेशी दारूच्या निपा सदर युवती घेऊन येत होत्या.पोलिसांनी वाहनासह दारू जप्त करीत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.(स्थानिक प्रतिनिधी)
युवतींकडून दारूची तस्करी
By admin | Updated: January 20, 2016 03:31 IST