शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही!

By admin | Updated: November 30, 2015 01:59 IST

देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले.

सुधीर सावंत : जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महिला अधिवेशनवर्धा : देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले. त्यामुळे कृषिक्षेत्राचे महत्त्व कमी होऊन वैफल्य, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला. शेतकऱ्यांचा स्वाभिमान परत येण्यासाठी कृषी क्षेत्राला अग्रक्रम द्यावाच लागेल, असे आग्रही मत माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी सहाव्या सत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन, चिंता आणि चिंतन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात सावंत बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस किशोर माथनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डी. छाया महाले, देवीदास साबापुरे, नारायण चोपडे, जयश्री कुरूटकर, अनुराधा ठोंबरे, डॉ. रेखा पाटील, लता ढेरे, कांच उल्हे आणि सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते. सुधीर सावंत म्हणाले, भारतात बाराही महिने सूर्य तळपत असतो. त्यामुळे येथे बारमाही पिके घेता येतात. तरीही आपलेच उत्पन्न आपल्याला पुरत नसल्याची स्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे. शेतकरी आत्महत्या ह्या भारतातच नाही तर इतर देशातही होत आहेत. त्याचे मूळ कारणच भाडवली अर्थव्यवस्थेत शेतीला देण्यात आलेले दुय्यम स्थान. सेवाक्षेत्रामुळे सर्वांना शासकीय नोकरी हवी आहे. त्यामुळे तर कषी क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान पदोपदी दुखावला जात आहे. आपल्याच कुटुंबाचे पालन पोषण करू शकत नसल्याचं शक्य त्याला बोचत आहे. महाराष्ट्रात ४० टक्के शेतकरी आत्महत्या या मुलाच्या लग्नासाठी द्याव्या लागत असलेल्या हुंड्यामुळे होत असल्याचे निरीक्षणही सावंत यांनी यावेळी नोंदविले. किशोर माथनकर म्हणाले, निखळ शेती करीत असलेला शेतकरीच शेती कसताना काय समस्या येतात हे सांगू शकतो. अनेक क्षेत्र ही केवळ शेतीमुळे जिवंत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रांनी शेतीची कदर करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान कमीत कमी खर्चात हळद काढण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या करंजाळा, हिंगोली येथील किसनराव मुळे यांचा सत्कार झाला. ते उपस्थित नसल्याने त्यांच्या पत्नीला हा सन्मान देण्यात आला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. संचालन प्रज्ञा ब्राह्माणकर तर आभार डॉ. विद्या कळसाईत यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)