शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पांदणमुक्तीविना ग्रामस्वच्छता नाही

By admin | Updated: July 25, 2016 01:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या ....

अनुदानातही केली वाढ : गावांतील पांदण रस्त्याची पालटणार दशा आष्टी (शहीद) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. या योजनांसाठी प्रत्येक गाव आधी पांदणमुक्त करावे लागणार आहे. तोपर्यंत योजनेत समावेश होणार नाही, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. यातून गावातील पांदण रस्ते विकासाची वाट मोकळी झाली आहे. शिवाय योजनेचे अनुदानही वाढवून देण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पांदण रस्ते विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून खर्च करता येणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाला तात्पुरती स्थगिती देऊन गाव विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या गावकरी तथा ग्रामसेवकांचा हिरमोड केला होता. अनेक गावांतील सरपंचांनी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला जाब विचारला होता. यावर मंत्रीमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनुसार येत्या २ आॅक्टोबरपासून अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी विविध पातळीवरून मूल्यमापन होणार आहे. मुख्य संसाधन केंद्र यांच्याकडून गावातील सर्व बाबींची तपासणी होणार आहे. यानंतरच ग्रामस्वच्छता अभियानात गावाचा समावेश होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे शासकीय योजना कटाक्षाने राबविल्या जाणार असल्याचे दिसून येते. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने प्रती शौचालय १२ हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. नागरिकांनी खड्डा खोदून द्यायचा असून उर्वरित सर्व खर्च शासनाकडून केला जात आहे. एवढी सुविधा देऊनही काही गावांतील नागरिक आडकाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी गावातील राजकारण आडवे येत आहे. गाव शिवारातील अनेक पांदण रस्ते अतिक्रमणाने घेरले गेले आहेत. शेतकरी धुऱ्यावर अतिक्रमण करून बसल्याने पांदण रस्ते दिसत नाहीत. ग्रामपंचायत पातळीवर मोजमाप करून देण्यासाठी पैसे भरावे लागत आहेत. अनेक ग्रामपंचायतींची स्थिती जेमतेम असून कराचा पैसा वसूल झाला नाही. अशा स्थितीत गावातील पांदण रस्ते मोकळे झाले नाही; पण शासनाने नवीन अट घातल्याने याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. आष्टी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त गावामध्ये १०० टक्के पात्र ठरल्या आहेत. उर्वरित ठिकाणी शौचालयांचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे. हागणदारी मुक्तीनंतर आता शासनाने ग्रामस्वच्छता अभियानासाठी पांदण मुक्ती करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गावांतील पांदण रस्त्यांचे रूप पालटणार, असेच दिसते.(तालुका प्रतिनिधी) पुरस्काराच्या रकमेतही केली वाढ ग्रामस्वच्छता अभियान राबवित असताना शासनाकडून पुरस्कार दिले जात होते. या पुरस्कारांच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे. यात तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार तृतीय १० हजार अशी रक्कम दिली जात होती. आता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५० हजार रुपये तर तृतीय २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. तेवढ्या तीव्रतेने गावांतील कामेही करावी लागणार आहेत. शिवाय पांदण रस्त्यांची अट घातल्याने आता गावाच्या स्वच्छतेसह पांदण रस्त्यांची दशाही पालटणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.