अंतिम पैसेवारी जाहीर : जिल्ह्यातील १३४१ गावांत दुष्काळसदृश स्थितीवर्धा : जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यानुसार प्रकल्पांतर्गत शहरीकरण वा अन्य कारणामुळे पीक घेतले जात नाही, अशी ४६ गावे वगळता उर्वरित १३४१ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० च्या आत आहे. आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी आणि कारंजा तालुक्यातील एकूण २९२ गावांची पैसेवारीही ५० च्या आत दर्शविली आहे. या पूर्वी या गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर जिल्हा प्रशासनाने दखल घेत या गावांनाही अखेर न्याय दिला आहे. अंतिम पैसेवारीनुसार, वर्धा तालुक्यातील १५४ गावे, सेलूतील १६८, देवळीतील १४९, हिंगणघाटातील १८७, समुद्रपूरातील २१९, आर्वीतील २०८, आष्टीतील १३६ आणि कारंजा तालुक्यातील १२० गावे अशी एकूण १३८७ पैकी १३४१ गावांची पैसेवारी ५० च्या आत जाहीर करण्यात आली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार मदतखरीप हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत १२८.८९ कोटी रुपये मिळणार आहे. पैकी ५३.७४ कोटी रुपये प्राप्त झालेले आहे. म्हणजे आवश्यकतेपैकी ४० टक्केच मदत प्राप्त झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनात सुरू आहे.ही शासकीय मदत जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना मिळणार याची आकडेवारीही प्रशासन काढण्याच्या कामात व्यस्त असली तरी ढोबळमानाने ती सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामध्ये सर्वच गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती आहे.
जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत
By admin | Updated: January 15, 2015 22:55 IST