शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वर्ध्यात येऊन गांधी आश्रमभेटीची इच्छा पूर्ण झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:48 IST

अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे गांधी आश्रमात घालविला दीड तास

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम  : सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी भेट देत आश्रमातील कार्याची माहिती जाणून घेतली. अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, सुमारे दीड तासांचा वेळ राज्यपालांनी गांधी आश्रमात घालविला.राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी १ वाजता आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळ, बापू की आत्मकथा, इंडिया माय ड्रीम व हिंद स्वराज ही पुस्तके देऊन त्यांचे आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत केले.

त्यानंतर राज्यपालांनी आदी निवास, बा-कुटी, बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदी स्मारकांना भेट देत माहिती जाणून घेतली. स्मारक तसेच आश्रमातील कार्याची माहिती प्रभू यांनी दिली. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली. या प्रसंगी पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, सरपंच सुजाता ताकसांडे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर आदींची उपस्थिती होती.भेटवहीत नोंदविला अभिप्रायबापू व विनोबा यांच्या साधनास्थळी येण्याची संधी मिळाली. साधेपणा, शांती, आत्मनिर्भरतेचा आभास या ठिकाणी होत आहे. या पवित्र तीर्थस्थळी युवाशक्तींचे भ्रमण व्हावे. नवीन पिढीने बापूंनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास सर्वच्या सर्व देशी, सर्व भाषा आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या बापूंच्या स्वप्नांना साकार करू शकतील. प्रवचक, साधक आहे, भगिनींना सादर प्रणाम! असा अभिप्राय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रमातील भेटवहीत नोंदविला.

रसोड्याच्या शेजारी घेतला जेवणाचा आस्वादआश्रमातील रसोड्याच्या बाजूच्या ठिकाणी टेबल-खुर्ची लावून राज्यपालांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी राज्यपाल कोश्यारी यांनी मिक्स भाजी, आलू-वांग्याची भाजी, पुरण, वरण-भात, मठ्ठा, सलाद आणि चटणीचा आस्वाद घेतला. तसेच आश्रम भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी खादीच्या कपड्यांची खरेदी केली. काही वेळ त्यांनी आश्रमच्या कार्यालयात घालवून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यपालांनी व्यक्त केली खंतपत्रकारांशी संवाद साधताना टी. आर. एन. प्रभू म्हणाले, अनेक दिवसांची गांधीजींच्या आश्रमात येण्याची इच्छा या भेटीतून पूर्ण झाली. नवी पिढी गांधी- विनोबांच्या विचारांकडे वळत नसल्याची खंत राज्यपालांनी व्यक्त केल्याचे प्रभू यांनी सांगितले. लॉकडाऊन शासनाचा निर्णय आहे. आश्रम पर्यटकांसाठी बंद आहे. अशातच राज्यपालांनी भेट दिली. ते अती महत्त्वाचे व्यक्ती असल्याने ते आश्रमात आले. आश्रम सर्वांचे असून या ठिकाणी येणाऱ्यांचे स्वागत आहे, असेही प्रभू यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSewagramसेवाग्राम