शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

वायरिंग जळाल्याने बस पडली बंद

By admin | Updated: June 1, 2016 02:38 IST

राज्य परिवहन मंडळाच्या बसेस भंगार व नादुरुस्त स्थितीत रस्त्यावर धावत आहे. यातील काही बस भर रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

आष्टी (शहीद) : राज्य परिवहन मंडळाच्या बसेस भंगार व नादुरुस्त स्थितीत रस्त्यावर धावत आहे. यातील काही बस भर रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. असाच प्रकार मंगळवारी दुपारी २ वाजता घडला. तळेगाव आगाराची एमएच २० डी. ९१४९ ही बस १२.३० वाजता वर्धा करिता रवाना झाली. दुपारी २ वाजता ही बस नागपूर-यवतमाळ बायपास वर वायरिंग पेटल्याने अचानक बंद पडली. अवघ्या काही वेळात बसमधून धूर येत असल्याचे पाहुन प्रवाशी धावपळ करीत खाली उतरले. सदर प्रवाशांना भादोड-वर्धा ही बस एम.एच. ४० ८५२४ आल्यावर बसवून देण्यात आले. यामध्ये बराच अवघी गेल्याने प्रवाशांचे हाल हाल झाले आहे. हा प्रकार आजचाच नसून दररोज भंगार बसेस रस्त्यावर धावत असताना कुठेही बंद पडत असतात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचे सोडून रिमोल्ड केलेल्या टायरवर बसेस धावत आहेत. बसायच्या सिट्स फाटल्याने खिळे रुततात. खिडक्या फुटल्याने कुठलीही सुरक्षा राहिलेली नाही. प्रवाशांनी चांगली सुविधा मिळावी म्हणून वारंवार मागणी होत आहे. असे असतानाही त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता वरिष्ठांनी पाठविलेल्या बसेस पुन्हा दुरुस्त करून कारभार हाकणे सुरू असल्याचे सांगितले. बसेस दुरुस्ती करण्यावर सद्या भर दिल्या जात आहे. स्पेअर पार्ट टाकून सद्याची गरज पूर्ण केली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळी बस बंद पडल्यावर तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे.(प्रतिनिधी)