शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हरणार नाय, लढणार, ४५०० झाडांचे करू रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:27 IST

स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देव्हीजेएमसह संघटनांचा संकल्प : आगलाव्या विकृतीला प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विकृतांनी घडविलेल्या आगीच्या या तिसऱ्या घटनेनंतर ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू‘ असे म्हणत वैद्यकीय जनजागृती मंचासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या दमाने साडेचार हजार वृक्षरोपांची लागवड करून जिंकू आणि जिंकूच, असा संकल्प केला आहे. जळालेल्या झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देत नवसंजीवनी दिली जात आहे.ओसाड हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. पदाधिकाऱ्यांनी एवढ्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. यामुळे हनुमान टेकडी परिसराला आॅक्सिजन पार्क अशीच नवी ओळख मिळाली. याच आॅक्सिजन पार्क परिसरात कित्येक जण सकाळी फिरायला येतात. रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली. परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांना दिली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होते. एक-दीड महिन्यांच्या कालावधीत विकृत मानसिकतेने टेकडीला तीनवेळा ‘टार्गेट’ केले. या घटनांना प्रत्युत्तर म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचासह विविध संघटनांनी तुम्ही निरागस, कोवळ्या ४५० झाडांची होळी केली तर नव्याने ४५०० वृक्षरोपांची मियावाकी प्रकल्प राबवून लागवड करण्याचा निर्धार केला आहे. जळित झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जात आहे. झाडे जाळण्याचे कार्य करणाऱ्यांनो, सावध व्हा, कारण प्रत्येक निसर्गमित्र आमच्या पाठीशी ठामपणे उभा असून नव्याने वृक्षलागवडीसाठी सज्ज आहे आणि हे कार्य कधीच थांबणार नसल्याचेही वैद्यकीय जनजागृती मंचने म्हटले आहे.