लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शूरविरांच्या बलिदानाची व त्यागाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याकरिता आष्टीच्या शहीद भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त करून देणारच, त्याकरिता दिल्लीदरबारी प्रयत्नांची पराकाष्टा करून हा दर्जा मिळवून देईल, असे अभिवचन खासदार रामदास तडस यांनी दिले.प्रागतिक सहजीवन संस्था, आष्टी शहीद आयोजन समितीअंतर्गत उपवर-वधू तथा पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्रद्धा मंगल कार्यालय येथे खासदार तडस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. शरद गुल्हाणे होते.खासदार तडस म्हणाले, संघर्षाशिवाय फळ मिळत नाही. राजकारण व समाजकारण हे साप मुंगसाची लढाई आहे. याचा ताळमेळ बसविताना कसरत होते. समाज पाठीशी होता म्हणून लोकसभेची उमेदवारी मिळाली. संत जगनाडे महाराजांचे सभागृह प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हावे याकरिता आपले प्रयत्न आहेत. समाजबांधवांच्या सोयीकरिता मुंबई येथे सभागृह तयार होईल. राज्यात १ कोटीमध्ये समाज पसरला आहे. समाजाने सतत संघर्षशील राहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.यावेळी खासदार तडस व अॅड. गुल्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष जयश्री मोकदम यांच्यासह व्यासपीठावरील इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चंद्रशेखर श्रीराव यांनी केले. विशेषांकाचे प्रकाशन खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आले.मेळाव्यात सहभागी झालेल्या मुलामुलींनी आपला परिचय करून दिला. संजय शिरभाते, निर्मला बिजवे, गजानन टाके, डॉ. वसंत गुल्हाणे, धनराज हिरूडकर, प्रशांत सव्वालाखे, नाना गुलवाडे, ज्ञानेश्वर वनारसे, प्रमोद ढांगे, महेश ढोले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त करून देणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST
खासदार तडस म्हणाले, संघर्षाशिवाय फळ मिळत नाही. राजकारण व समाजकारण हे साप मुंगसाची लढाई आहे. याचा ताळमेळ बसविताना कसरत होते. समाज पाठीशी होता म्हणून लोकसभेची उमेदवारी मिळाली. संत जगनाडे महाराजांचे सभागृह प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हावे याकरिता आपले प्रयत्न आहेत. समाजबांधवांच्या सोयीकरिता मुंबई येथे सभागृह तयार होईल. राज्यात १ कोटीमध्ये समाज पसरला आहे. समाजाने सतत संघर्षशील राहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त करून देणारच
ठळक मुद्देरामदास तडस : आष्टी येथे उपवर-वधू, पालक परिचय मेळावा