शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा अट्टाहास, पतीने केले खल्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:29 IST

घरगुती कामात व्यस्त असलेल्या पतीकडे मुलीला शाळेत सोडून देण्याचा आग्रह धरणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापाणी या गावात घडली.

ठळक मुद्देकुऱ्हाडीने केला वार : जुनापाणी गावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरगुती कामात व्यस्त असलेल्या पतीकडे मुलीला शाळेत सोडून देण्याचा आग्रह धरणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापाणी या गावात घडली.संध्या केशव भस्मे (३०) रा. जुनापाणी असे मृतक पत्नीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी पती केशव भस्मे (३४) हा घरी शेड बनविण्याच्या कामात व्यस्त होता. तेव्हा मुलीला शाळेत सोडून देण्याकरिता मृतक संध्यांनी त्याच्याकडे आग्रह धरला. त्यामुळे संतापलेल्या केशवने हातची कुऱ्हाड तिच्या डोक्यावर मारली. यात तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने ती धाडकन जमिनीवर कोसळली. आवाज ऐकून लगेच मुलगी धावत आल्यानंतर तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून आरडाओरड केली. लागलीच गावातील नागरिकांनी धाव घेऊन संध्याला कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. आठ दिवासांपासून संध्याचे वडील तिच्याकडे राहत असून ते घटनेदरम्यान शेताकडे गेले होते. त्यांना कळताच तेही धावत घरी परतले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी केशव याने घटनेनंतर स्वत: पोलीस स्टेशन गाठून हत्येची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक कली असून पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.रुग्णालयातील कर्मचारी बेपत्तासंध्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता. मृतदेह रुग्णालयातून शवविच्छेदन गृहापर्यंत व आत नेण्याची सर्व जबाबदारी मृतकाचे वडील व नातेवाईकांनाच पार पाडावी लागली. यावेळी रुग्णालयातील एकाही कर्मचाऱ्याने हातभार लावला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या रुग्णालयातील कर्मचारी आहे, तरी कशाला, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला.

टॅग्स :Murderखून