शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

संपूर्ण आकाश ‘कंदिलां’नी गजबजले

By admin | Updated: October 18, 2014 23:45 IST

दिवाळी म्हटलं की समोर उभा राहतो दारी अलगद झुलणारा वेगवेगळ्या रंगांचा आकाशदिवा. त्यामुळे आकाश कंदिल बघितला की दिवाळी आली असे लक्षात यायला लागले. त्यामुळे दिवाळीचे वेध लागले की

वर्धा : दिवाळी म्हटलं की समोर उभा राहतो दारी अलगद झुलणारा वेगवेगळ्या रंगांचा आकाशदिवा. त्यामुळे आकाश कंदिल बघितला की दिवाळी आली असे लक्षात यायला लागले. त्यामुळे दिवाळीचे वेध लागले की यंदा कसा आकाश दिवा घ्यायचा याचा विचार सुरू होतो. शहरात आकाश दिव्यांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत असल्याने आकाश ‘कंदिलां’नी सजल्याचे दिसून येत आहे.आधी एक आकाशदिवा घेतला की तो दोन ते तीन वर्ष वापरण्याचा दंडक होता. निव्वळ आकाश कंदिलासाठी एवढे पैसे कशाला खर्च करायचे असा सर्वसाधारण विचार होत असे. पण आता मात्र चित्र पालटले आहे. दरवर्षी नवा आकाशदिवा घेण्यावर भर दिला जातो. तसेच एकच आकाशदिवा न घेता घरी, गच्चावर, गॅलरीत असे अनेक ठिकाणी आकाशदिवे लावण्यासाठी घेतले जातात. शहरातही सरळ मुंबईवरून बनलेले आकाशदिवे दिसून येतात. वेगवेगळ्या सुट्या भागात ते आणले जातात आणि येथे जोडले जातात. कधी कधी त्यात रंगसंगतीत जोडताना बदल केले जातात. खास बनावटीचे असे मोठे आकाशदिवे शहरात मिळत नाही. ३०० ते १५०० रुपयांपर्यंत आकाशदिवे मार्केटमध्ये पहावयास मिळतात. यात पारंपरिक षटकोनी आकाश कंदिलांसोबतच गोल आकाराचे चायनीज, कमळाच्या फुलाचे आकाशदिवे नजरेस पडतात. हे सर्व असताना नवीन काय असा पहिला प्रश्न नागरिकांना पडत असतो.दरवर्षी वेगळा प्रकार घ्यावा असा सर्वांचा कल असतो. मोठ्या आकाशदिव्यांसोबतच लहान लहान आकाशदिव्यांनाही विशेष पसंती मिळत आहे. एका दमात दहा ते बारा लहान कंदिल घेऊन ते घरी खूप ठिकाणी लावले जातात. बालकनीत असे आकाशदिवे लावण्याची फॅशन सध्या प्रचलित आहे. पूर्वी घरी आकाशदिवा बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात तावाची मागणी व्हायची. आता तो प्रकार दिसत नाही. तसेच काही वर्षापूर्वी कापडी आकाशदिव्यांची मागणी होती. पण उन्हामुळे कापडाचा रंग उडत असल्याने त्यांना आता विशेष पसंती दिली जात नाही. (शहर प्रतिनिधी)