शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:58 IST

अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी द्विधा मनस्थितीत : ठोस निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाच्या भाववाढीची तो प्रतीक्षा करीत आहे.कापूस खरेदीच्या मुहूर्ताला व्यापाऱ्यांनी ५८०० ते ९०० असा भाव दिल्याने कापूस ६००० च्या वर जाईल, अशी आशा होती, पण दिवाळीचा सण आणि कापसाची वेचणी एकाचवेळी आल्याने शेतकऱ्यांजवळ कापूस वेचणीची मजुरी देण्यासाठी पैशाची चणचण असल्याने मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. यावर्षी पाऊस वेळेवर आला नसल्याने तसेच शेतातील विहिरीला असलेली पाणीपातळी कमी झाल्याने कोरडवाहू तसेच बागायती शेतातील कपाशीचे पिकाचे उत्पादन घटले. अशा परिस्थितीत कापसाला भाव चांगला मिळेल, अशी आशा कापूस उत्पादक शेतकºयांना होती. अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांनासुद्धा शेतमालाला मिळणारा भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºयांवर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय नेते शेतमालाला भाव कमी मिळत असताना गप्प आहेत. त्यामुळे अस्मानी संकट आले तर ते मान्य, पण सुल्तानी संकट कायमच असल्याने आच्छे दिनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे कापूस वेचणीस मजूर मिळेना, कापूस वेचणी महागली, अशात भाव उतरत आहे. कापसाची प्रत चांगली नसल्याने भावात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी कापसाचे पीक परवडणार नाही, तर युवा शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापसाचे स्थिर भाव कापूस उत्पादकांच्या पथ्यावर पडत आहे. नवीन वर्षात तरी कापसाचे भाव वाढतील, ही आशा शेतकऱ्यांना असल्याने तूर्तास कापूस विक्री थांबविण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसत आहे. उत्पादन खर्चावर भाव हे मृगजळ ठरत असताना बोंडअळीच्या अनुदानासाठी शेतकरी बँकेच्या पायºया वर्षभरापासून झिजवत आहे. कर्जमाफीपासून शेतकरी अद्याप दूर असल्याने चर्चेतून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.राजकीय पुढारी मौन बाळगूनअच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांना सद्यस्थितीत शेतमालाला मिळत असलेला भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली तर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय पुढारी आज शेतमालाला कमी भाव मिळत असताना मौन बाळगून आहेत. कुणी वालीच नसल्याने दाद तरी कुणाकडे मागायची, असा पश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :cottonकापूस