शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोनं चकाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:04 IST

आनंद इंगोले । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यावर्षी पावसाच्या हुलकावणीने कापसाचे उत्पादन घटले आहेत. परिणामी आंततराष्ट्रीय बाजारात तेजी ...

ठळक मुद्देउत्पादनात घट : भाव सहा हजार पार होण्याची शक्यता

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी पावसाच्या हुलकावणीने कापसाचे उत्पादन घटले आहेत. परिणामी आंततराष्ट्रीय बाजारात तेजी राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पांढऱ्या सोन्याचे भाव दिवाळीनंतर वधारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा भाव ६ हजारांचाही पल्ला पार करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन कापसाची विक्री करण्याची गरज आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून दगाफटकाच बसला आहे. मागील वर्षी कापूस उत्पादकांना गुलाबी बोंडअळीच्या प्रकोपामुळे नुकसान सहन करावे लागले. तर यावर्षी परतीच्या पावासाने पाठ फिरविल्याने उत्पादनात मोठी घट झाली. कोरडवाहू शेतकऱ्यांचे उत्पादन निम्यावर आले असून सिंचनाची सोय असलेल्या कापूस उत्पादनकांनाही यावर्षी तुट सहन करावी लागत आहे. मागील दोन वर्षापूर्वी एकारी १२ ते १४ क्विंटल कापूस झाला. परंतु, मागील वर्षी आणि यंदा हा उतारा केवळ सहा ते दहा दरम्यानच स्थिरावला आहे. काही भागांमध्ये पहिल्याच वेच्यात उलंगवाडी झाल्याची स्थिती पहावयास मिळते.यामुळे उत्पादनात घट असल्याने शासनाचा ५ हजार ४५० रुपयाचा हमीभाव पार करुन कापसाला सध्या ५ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हा भावही मागील काही दिवसांपासून कमी झाला नसल्याने दिवाळीनंतर वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत चांगल्या प्रतिचा कापूस निघणार असल्याने या कापसाला सहा हजार रुपयांपेक्षाही जास्त भाव मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. सध्या सीसीआयपेक्षाही अधीक भाव शासनाकडून मिळत असल्याने शेतकरी बाजार समित्यांकडेच धाव घेत आहेत. यावर्षी शेतकºयांनी सहा हजार रुपयापेक्षाही जास्त भाव मिळाला तर शेतकºयांना तेवढाच आधार होईल, असे कपाशी उत्पादक शेतकºयांकडून बोलले जात आहे. शासनानेही उत्पादन खर्चावर आधारीत कापसाला भाव देण्याची मागणी आहे.दुष्काळाच्या सावटामुळे उलंगवाडीजिल्ह्यात सध्या दुष्काळाचे सावट असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. तसेच जलाशयही तळच दाखवत असल्याने शेतकऱ्यांना आता सिंचनाकरिता अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी कापूस उत्पादनात घट सहन करावी लागत आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांची पहिल्याच वेच्यात उलंगवाडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.यावर्षी कापसाचे पीक कमी झाले असून कोरवाहू कापसाच्या उत्पन्नात जवळपास ३० ते ४० टक्के घट झाली आहे. कापसाच्या भाव वाढीचा प्रश्न जागतिक दर्जाचा आहेत.सध्या सुताचे व कापडाचे भाव कमी आहेत. त्या भावात वाढ झाली तर कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण, कापसाचे भाव यापेक्षा कमीही होणार नाही.- अ‍ॅड.सुधीर कोठारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाटमोदी सरकारने हमीभाव वाढविल्यामुळे कापसाचे दर वाढलेले नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमुल्यन झाल्यामुळे कापसाचे दर वाढले आहेत. मागील वर्षी शासनाने ४ हजार ३०० रुपये हमी भाव जाहीर केल्यानंतर बाजारपेठेत कापूस ५ हजार २०० रुपयापर्यंत गेला होता. यावर्षी ५ हजार ४५० रुपये हमीभाव दिल्यानंतर कापसाचे भाव ५ हजार ८०० पर्यंत पोहोचले यात काही वावगं नाही. जागतिक बाजारात तेजी असल्याचे सांगितले जाते त्यानुसार कापसाला फारसा भाव मिळालेला नाही. सरकीचे आणि रुईचेही भाव कमी आहे. याच्या भावात वाढ झाली तरच कापसाचा भाव आणखी वाढू शकतो.-विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक