शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ठरतेय पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:00 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास साधता यावा म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली; पण अधिकाºयांनी या योजनेची वाट लावली आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या कामाच्या निविदा जैसे थे आहे.

ठळक मुद्देरस्त्यांचा दर्जा सुमार : देखभाल, दुरूस्तीसह वृक्षारोपणातही गौडबंगाल

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास साधता यावा म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली; पण अधिकाºयांनी या योजनेची वाट लावली आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या कामाच्या निविदा जैसे थे आहे. यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्तेच सुधारत नसल्याने ही योजना पांढरा हत्तीच ठरत असल्याचे दिसते.कोट्यवधी रुपये खर्च करूनही सामान्यांना चांगल्या प्रवासाला मुकावे लागत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे सुरू आहेत; पण ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने रस्त्याची निर्मिती होणार की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. अंदाजपत्रक तयार करताना कार्यकारी अभियंत्यांनी भरपूर तरतूद केल्याचे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात काम नियमाप्रमाणे होत नसल्याचेच दिसून येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले अधिक लांबीच्या रस्त्यांचा समावेश करण्यता आला आहे. यासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष करण्यात आलेली कामे, यात कुठेही हिशेब जुळत नसल्याचेच दिसून येत आहे. दोन्ही बाजूला खोदलेल्या नाल्या कमी दिसत आहे. खाली करावयाचा मुरूम अस्तरीकरणाचा कोट थातुरमातुर करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.एकदा सुरू झालेल्या कामाला गती देत ते पूर्ण करण्याचे सोडून आर्थिक जुळवाजुळव करण्यासह स्व-हित जोपासण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचेच दिसून येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता या सर्व साखळीने कंत्राटदारांशी हातमिळवणी करून सुमार दर्जाची कामे करण्यावर भर दिल्याचेच दिसून येत आहे. अंदाजपत्रकात असलेल्या साहित्याचा दर्जा कुठेही आढळत नाही. ४० एमएम, ८० एमएम कोड करताना निव्वळ मुरूम अधिक टाकला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सध्या पावसाळ्यात कामे बंद करण्यात आली होती.२०१६-१७ मध्ये कार्यारंभ झालेली सर्व कामे जलदगतीने पूर्ण करा, असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले होते; पण त्याची कुठेही अंमलबजावणी केली जात नसल्याची ओरड होत आहे. यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशाला बगल दिली जात असल्याचेच दिसते. जिल्ह्यात सर्वत्र कामे सुरू असली तरी त्या कामांना गती अद्यापही प्राप्त झालेली नाही. शिवाय आर्थिक हित जोपासण्याच्या प्रयत्नात रस्त्यांची कामे अत्यंत ढिसाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर अल्पावधीतच अवकळा येते. काही महिन्यांपासून कामे सुरू असलेले रस्ते ‘पुढे पाठ, मागे सपाट’, या पद्धतीने होत असल्याचेच पाहावयास मिळत आहे. काही कंत्राटदार कामांचा दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असले तरी अभियंत्यांच्या कमिशनबाजीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रस्त्यांचा दर्जा टिकविणे शक्य होत नसल्याचे कंत्राटदार खासगीत बोलून दाखवितात.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत होत असलेल्या या गैरप्रकाराकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचेच दिसून येत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचे झाले आहे.