शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पशुपालन अर्थसाहाय्य योजना ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: October 15, 2014 23:22 IST

जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य

वर्धा : जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य योजना तयार करण्यात आली. पण शासकीय अधिकाऱ्यांच्या दफ्तरदिरंगाईमुळे ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.जिल्ह्यातील पशुधन घटत चालले आहे. ते वाढावे यासाठी शासनाने पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजना कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून शेतीकडे पाहिल्या जाते. आजही ग्रामीण भागातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीबरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र व्यवस्थित चालावे यासाठी पशुपालनावर भर दिला जातो. सध्या पशूपालन हा व्यवसाय करीत असलेल्यांसाठी अनेक योजना आहेत. पण शासन त्याची योग्य माहितीच देत नसल्याने आणि अनुदान देताना त्रास देत असल्याने या योजना कागदावरच उरल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर शेती व्यवसायात सातत्याने वैशिष्टपूर्ण बदल झाले आहेत. अयोेग्य नियोजन, निसर्गाने न दिलेली साथ, व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज, वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यासांठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्याने आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु, अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही, ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनाबद्दलची माहिती मिळाली आहे. बऱ्याच लोकांना योजनाच माहित नसल्याने योजना या पांढरा हत्ती ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)