शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

कुठे कचरा, तर कुठे शेती साहित्य

By admin | Updated: December 1, 2014 22:57 IST

पुर्व शालेय शिक्षण व कुपोषणमुक्ती याकरिता मोठा गाजावाजा करून गावागावात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. यामागचा शासनाचा उद्देश अंगणवाड्यांचे विदारक वास्तव बघितल्यानंतर साध्य होत आहे का,

अंगणवाड्यांची दैना पाहून सीईओही अवाक्अरविंद काकडे - आकोलीपुर्व शालेय शिक्षण व कुपोषणमुक्ती याकरिता मोठा गाजावाजा करून गावागावात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. यामागचा शासनाचा उद्देश अंगणवाड्यांचे विदारक वास्तव बघितल्यानंतर साध्य होत आहे का, असा प्रश्न पडतो. ग्रामीण भागात अंगणवाडी सुरू होण्याची वेळ सकाळची असली तरी अंगणवाडी सेविका व मदतनिस अंगणवाडीतच येत नसल्याचे वास्तव सेलू तालुक्यात ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’च्या माध्यमातून पुढे आणले आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ उदय चौधरी यांना सचित्र देताच अंगणवाड्यांची अवस्था व सेविकांचा कामातील गलथानपणा पाहून तेही अवाक् झाले. अंगणवाडी सुरू होण्याची शासकीय वेळ सकाळी ९.३० वाजताची आहे. याचवेळी आकोली-आंजी मार्गावरील जि.प. शाळेत भरणारी अंगणवाडी व आकोली (हेटी) येथील अंगणवाडीला भेट देण्यात आली. आकोली-आंजी मार्गावरील अंगणवाडीत अंगणवाडी सेविका व मदतनिसाचा पत्ताच नव्हता; मात्र आकोली हेटी येथील अंगणवाडीत अंगणवाडी सेविका पल्लवी कुंडलकर व मदतनीस कविता पाझारे हजर होत्या. येथे मात्र विद्यार्थ्यांचा पत्ता नव्हता. पुन्हा एका तासाने सकाळी १०.३० वाजता आकोली-आंजी मार्गावरील अंगणवाडीला भेट दिली. तरीही ती कुलुपबंदच होती. नंतर काही वेळाने मदतनीस आली. त्यावेळी सकाळचे १०.४५ वाजले होते. यानंतर अंगणवाडी सेविका रंजना पिंपळे अंगणवाडीत दाखल झाल्या. अर्धा तास अंगणवाडीत कुणी बालक येते का याची वाट पाहण्यात आली; मात्र एकही बालक अंगणवाडीत आला नाही. याच परिसरातील वस्तीत पाहणी केली असता काही उघडी-नागडी पोर गावात हिंडत होती. अंगणवाडी भोवती सर्वत्र गवत व झुडपे वाढलेली आहेत. अंगणवाडीच्या आत एका कोपऱ्यात रेतीचा ढीग व शेतीचे साहित्य ठेवून आहे. तर बाजुलाच बांधकामाकरिता आणलेल्या विटा दिसून आल्या. बालकांना बसण्याकरिता जेमतेम १० बाय १० ची खिडकी नसलेली खोली होती. त्यातच स्वयंपाक करण्याची भांडी, दोन खुर्च्या, उलटे टांगलेले भित्तीपत्रक, मधोमध पडलेला झाडू (फडा) होता. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता ना चटई होती ना खेळणी, अशी विदारक स्थिती या अंगणवाडीची होती.