शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेचा लाभ कधी मिळणार?

By admin | Updated: December 25, 2014 23:37 IST

सोयाबीन या पिकाचा पीक विमा हप्ता परिसरातील जवळजवळ सर्वच कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी भरला. कधी नव्हे एवढी नापिकी झाली. आता पीक विमा योजनेचा फायदा आपणास मिळेल असे

फणिंद्र रघाटाटे - रोहणासोयाबीन या पिकाचा पीक विमा हप्ता परिसरातील जवळजवळ सर्वच कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी भरला. कधी नव्हे एवढी नापिकी झाली. आता पीक विमा योजनेचा फायदा आपणास मिळेल असे वाटत असताना योजनेचा लाभ मिळण्याची १५ डिसेंबर ही तारीख उलटून गेली. तेरीही शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात पीक विमा योजनेचा लाभ जमा झालेला नाही. परिणामी, सदर लाभ कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ खरीप हंगामाच्या वेळी राज्याच्या कृषी विभाग व बँॅकांनी भरपूर प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या पीक विमा योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त केले. कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा योजनेचा सदर पिकांचा हफ्ता बॅँकांनी परस्पर काढून घेतला. तर गैरकर्जदार शेतकऱ्यांना विविध प्रलोभने दाखवित नगदी जमा करण्यास बाध्य केले. खरीपाच्या सुरूवातीला हवामानाचा सूर लक्षात घेता यावर्षी दुष्काळ पडणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत असल्याने जवळजवळ ९० टक्के शेतकऱ्यांनी कोट्यावधी रूपये पीक विम्या हफ्त्याच्या स्वरूपात बॅँकेत जमा केले. त्यामुळे विमा कंपनी मालामाल झाली. आता खरिपाचा हंगाम संपला. पिकांची पैसेवारी अत्यल्प आली. सर्वत्र दुष्काळ पडला. त्यामुळे यंदा नक्कीच पीक विमा योजनेचा लाभ आपल्याला मिळेल अशी आशा समस्त शेतकऱ्यांना होती. पीक विमा योजनेचा लाभ दि. १५ डिसेंबर पर्यंत पात्र शेतकऱ्यांना दिला जावा असा नियम आहे. पण तारीख लोटूनही विमा कंपन्या आणि शासन गप्प आहे. त्यामुळे याबाबत कोणाला विचारावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कुणालाही विचारण्यापेक्षा शेतकरी आपसातच एकमेकांना पीक विमा योजनेचा लाभ केव्हा मिळणार असा प्रश्न वारंवार विचारताना दिसत आहे.