शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत विद्यालयाची इमारत कधी होणार?

By admin | Updated: March 17, 2017 02:05 IST

शाळा बांधकामासाठी काही वर्षांपूर्वी देवस्थानच्या मालकीची जागा यशवंत संस्थेने घेतली; पण त्या जागेवर अद्याप शाळेची इमारत उभी झाली नाही.

पालक व ग्रामस्थांचा सवाल : ४० वर्षांपासून ती जागा इमारतीच्या प्रतीक्षेत घोराड : शाळा बांधकामासाठी काही वर्षांपूर्वी देवस्थानच्या मालकीची जागा यशवंत संस्थेने घेतली; पण त्या जागेवर अद्याप शाळेची इमारत उभी झाली नाही. यामुळे शाळा इमारत बांधकामाचा मुहूर्त सापडणार काय, असा प्रश्न ग्रामस्थ व पालक उपस्थित करीत आहेत. घोराड येथे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेने शाळा सुरू केली, तेव्हा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत इयत्ता ५ ते ७ भरविले जात होते. १९८४ मध्ये ही शाळा ५ ते १० वर्गापर्यंत झाली. तेव्हा या संस्थेने पांडुरंग राऊत यांच्या मालकीची असलेली इमारत किरायाने घेतली. ३३ वर्षांपासून यशवंत शाळा भाड्याच्या इमारतीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. ४० वर्षांपूर्वी या संस्थेने हिंगणी मार्गावरील रस्त्यालगत विठ्ठल-रूख्माई देवस्थान ट्रस्टच्या मालकीची तीन एकर जागा शाळेची इमारत बांधकामासाठी शासकीय नियमानुसार खरेदी केली; पण या जागेवर अद्याप शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात आले नाही. या जागेचा संस्थेकडून क्रीडांगण म्हणूनही कधीच वापर करण्यात आला नाही. या जागेवर काटेरी झुडपे वाढली आहे. ती जागा पडिक का ठेवली, हा संशोधनाचा विषय आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम करायचे नव्हते तर देवस्थानची जागा खेरदी का केली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या जि.प. निवडणूक प्रचारात हा मुद्दा चर्चेला आला. जाहीर सभेत यशवंत संस्थेने ४० वर्षांपूर्वी घेतलेल्या विठ्ठल-रूख्माई देवस्थानच्या तीन एकर जागेवर इमारत उभी न झाल्याने ती देवस्थान ट्रस्टने परत घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. या मागणीला ग्रामस्थांचे समर्थन राहील, असे आवाहन माजी जि.प. सदस्य सुरेंद्र खोपडे यांनी केले होते. यामुळे ग्रामस्थांचे लक्ष त्या जागेकडे लागले आहे. संस्था शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू करणार की ती जागा देवस्थानाला परत मिळवून देण्यासाठी कुणी पुढाकार घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ४० वर्षांनी जागेचा मुद्दा चर्चेत आल्याने ग्रामस्थ मात्र सजग झाले.(वार्ताहर)