शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

वडगावचे पुनर्वसन कधी होणार

By admin | Updated: October 22, 2014 23:22 IST

प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे

गिरड : प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे नुकसान होते. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकतो. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यामुळे पुनर्वसन कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. १९८० मध्ये पोथरा प्रकल्पाची निर्मिती झाली. या धरणाकरिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. पावसाळ्यात धरणाचे पाणी शिरुन गावाचा संपर्क तुटतो. गावाबाहेर जाणारे सर्व मार्ग बंद होतात. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरले. कित्येक दिवस गावकरी यातना सहन करीत होते. गावाचे पुनर्वसन करण्याकरिता गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन दिले. परंतु याकडे कानाडोळा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा यांना पत्र देऊन पुनर्वसन करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यास कळविले. त्यानंतर त्याबाबत पाहणीसुद्धा झाली. पोथरा धरणाची पूर्ण पातळी २२९९.४०० मीटर तर महत्तम जलपातळी २३१.२३० मीटर व धरणमाथा पातळी २.३३.०३० मीटर आहे. तेव्हा धरणमाथा पातळी २३३.०३० तलंकापर्यंत येत असल्यामुळे वडगाव गावात बॅक वॉटर पूर्णपणे होते, असा निष्कर्ष काढण्यात आला. गावात येणारे संपूर्ण मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, असे शासनालासुद्धा कळविण्यात आले होते. अहवाल पाठविताना पोथरा प्रकल्प हा गावापासून ५०० मीटर अंतरावर असून लोकसंख्या ५६१ असून १३६ कुटुंबसंख्या आहे. पुनर्वसनाकरिता १२.६५ आर.क्षेत्राची गरज असल्याचेही नोंदविण्यात आले. ग्रा.प.द्वारे ठराव घेऊन पुनर्वसनासाठी आवश्यक शेतजमिनीचे सर्व्हे क्रमांक कळविण्यात आले. अनेक शेतकरी पुनर्वसनाकरिता शेतजमीन देण्यास तयार असल्याचे सुद्धा कळविण्यात आले. मात्र अद्याप शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)