शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी-किन्हाळा रस्त्याचे भाग्य उजळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:24 IST

आष्टी - किन्हाळा हा ६ किमीचा रस्ता गत अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे अर्धे काम काही वर्षांपूर्वी झाले असले तरी उर्वरीत कामासाठी निधीच नसल्याचे सांगितले जात असल्याने सदर रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, ....

ठळक मुद्देअर्धा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत : मुख्यमंत्र्यांना पाठविले होते निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : आष्टी - किन्हाळा हा ६ किमीचा रस्ता गत अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे अर्धे काम काही वर्षांपूर्वी झाले असले तरी उर्वरीत कामासाठी निधीच नसल्याचे सांगितले जात असल्याने सदर रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांकडून उपस्थित केल्या जात आहे. उल्लेखनिय म्हणले ही समस्या निकाली निघावी म्हणून मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आले होते.आष्टी-किन्हाळा हा रस्ता जि. प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय डांबरीकरणाचे कामही दीड किमीपर्यंत काही वर्षापूर्वी झाले. आतापर्यंत त्यासाठी सुमारे ७६ लाख रूपये खर्च झाले आहे. उर्वरीत डांबरीकरणाच्या कामासाठी १ कोटी रूपये आवश्यक आहे;पण जि.प. बांधकाम विभागाला राज्य सरकारकडून पाहिजे तेवढा निधी येत नाही. त्यामुळे तुकडे पाडून अल्प निधीतच काम करावे लागते. सन २०१६-१७ मध्ये या रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपये आले होते. त्यामधून खडीकरण करण्यात आले. रस्त्यावरून कॅनलचे पाणी वाहते त्याठिकाणी पुल मंजूर झाला नाही. त्यामुळे चिखलातुनच ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरचे भूपृष्ठ आवरण समतल नसल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करीत पुढील प्रवास करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह या भागातील नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा या ठिकाणी नाही. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने ये-जा करावी लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी गजानन आंबेकर, दिनेश मानकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.