शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचे अनुदान देता तरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:52 IST

मागील वर्षी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर झाली. काहींना दोन टप्प्यात शासकीय मदत देण्यात आली असली तरी अद्यापही अनेकांना प्रत्यक्षात जाहीर झालेली शासकीय मदत मिळालेली नाही.

ठळक मुद्देहवालदिल कपाशी उत्पादकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील वर्षी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर झाली. काहींना दोन टप्प्यात शासकीय मदत देण्यात आली असली तरी अद्यापही अनेकांना प्रत्यक्षात जाहीर झालेली शासकीय मदत मिळालेली नाही. शासकीय मदत बँक खात्यात जमा झाले की नाही यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत असून बोंडअळीचे नुकसान देता तरी केव्हा असा संतप्त सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.पांढर सोन अशी कापसाची ओळख. परंतु, याच पांढºया सोन्यावर मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतकेच नव्हे तर उत्पादनातही मोठी घट आली होती. हवालदिल झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. दोन टप्प्यातील १६ कोटींचा वाटप सुद्धा झाला. परंतु, उर्वरित ८ कोटी ३१ लाख रूपयाचा तिसरा टप्पा अद्यापही कार्यालयातच पडून आहेत. तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्यात आला नाही. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चालढकलच केली जात असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चिकणी, पढेगाव, निमगाव, सेलसूरा, वडद आदी गावांमधील नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून संबंधित विभागाला १५ दिवसापूर्वीच रक्कम आली आहे; पण अधिकाऱ्याच्या दुर्लक्षी धोरणामुळे शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचली नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, आम्हाला आताही बँकेतच चकरा माराव्यास लागत आहेत. १५-१६ नोव्हेंबरपर्यंत आमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते; पण अद्यापही शासकीय अनुदान बँक खात्यात जमा झाले नाही.- मोरेश्वर पारोदे, शेतकरी, चिकणी (जामणी).आम्ही पूर्ण शेतकºयांच्या बँक खात्याची माहिती आणि क्रमांक वरिष्ठांना पाठविले आहेत. या महिन्यात अधिक सुट्ट्या आल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहचायला विलंब होत असावा.- आशीष सहारे, तलाठी, चिकणी (जामणी).

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती