शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला पाणी मिळणार तरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:52 IST

निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देपाटचरींना झुडपांचा विळखा : पाण्याकरिता आॅईल इंजिनची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे ज्यांच्या शेताजवळून कालवा गेला आहेत. त्यांनाच पाण्याकरिता आटापीटा करावा लागत असल्याचे वास्तव आहेत. चिकणी शिवारात नितीन अतकरे यांच्या शेतातून मोठा कॅनल गेला आहेत व याच कॅनलच्या पाटचºया गजानन राऊत, संजय अतकरे, नितीन भोयर, बळवंत डायरे, प्रदीप भोयर, सुभाष कन्नाके, सोनबा डायरे, गुलाब डायरे, महादेव डायरे यांच्या शेताजवळून गेल्या आहेत. परंतु सदर कॅनलचे पाणी यांच्या शेतापर्यंत पोहचतच नाही. सदर शेतकरी पाण्याकरिता जिवाचा आटापीटा करीत आहेत. तसेच आॅईल इंजिनने पाणी देणे खर्चाला न परवडणारे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. आमचे शेत वरच्या भागाला असल्यामुळे पाणी येत नाही. परंतु पाटचºया खोल केल्यात तरा आम्हाला पण पाणी मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या परंतु शासनाच्या पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती सिंचन अडचणीत आले आहे. यांचा परिणाम उत्पादनावर होत आहे.लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सर्वच प्रकल्पाची व्यथा सारखीचवर्धा जिल्ह्यात बोर हा सर्वात जुना प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाटसºया या झाडे व झुडपांनी वेढलेल्या आहेत.त्यामुळे शेती सिंचनास अडचण निर्माण झाली आहे. अशीच परिस्थती ही आष्टी तालुक्यातील पाटसऱ्यांची आहे. निम्म वर्धा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणी हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. पाटबंधारे विभागाने समस्या सोडवावी.वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची समस्या सांगीतली व ते म्हणाले दुसऱ्या पाण्यापर्यंत तुमची समस्या मार्गी लागेल व तुम्हाला पाणी मिळेल परंतु अद्यापही समस्या कायम आहेत. त्वरीत पाटचऱ्या खोल कराव्यात व आम्हाला पाणी द्यावेत अशी आमची मागणी आहेत.- जगदीश डायरे, शेतकरी चिकणी.