शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आष्टीच्या शहीदभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे.

ठळक मुद्देहुतात्मा स्मारक समितीची धडपड : नागपंचमीलाच झाली होती रक्तरंजित क्रांती, नेत्यांनाही पडला आश्वासनाचा विसर

आकाश सव्वालाखे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात नागपंचमीच्या दिवशी आष्टीला रक्तरंजित क्रांती झाली होती. यामध्ये काहींनी हुताम्य पत्कारले तर काहींना जन्मठेप झाली होती. मात्र, या क्रांतीला ७८ वर्षाचा कार्यकाळ लोटला तरीही या शहीद भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी मिळेल, असा प्रश्न हुतात्मा स्मारक समितीने, क्रांतीदिनाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे. क्रांतीस्थळ तेव्हाचे पोलीस स्टेशन तर आताचे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय म्हणून आळखले जाते. स्वातंत्र्यलढ्याचे स्थळ सुरक्षित रहावे म्हणून १९५८ साली येथे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. हुतात्मा स्मारक समितीच्या पुढाकारातून या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू लागले. गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय झालेल्या स्मारक समितीच्यावतीने या ऐतिहासिक स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी लाऊन धरली. आष्टीला पंतप्रधान ते मुख्यमंत्रीपर्यंतच्या मंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे आश्वासनही दिलेत पण, आज ७८ वर्षानंतरही ही क्रांतीभूमी त्यापासून वंचितच आहे....तर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेलयेथील स्वातंत्र्यलढ्यावरील लघुचित्रपट तयार करण्यात आला. त्याचे शाळा, महाविद्यालय, विधानसभा, विधान परिषद येथे सादरीकरण करण्यात आले. तसेच पंतप्रधानांपासून तर राष्ट्रपतींपर्यंत पोहोचून अरविंद मालपे व भरत वणझारा यांनी राष्ट्रीय स्मारकाची मागणी लावून धरली. पण, अद्याप यश प्राप्त झाले नाही. या स्वातंत्र्यलढ्याला तात्काळ राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्यास खºया अर्थाने शहिदांना श्रद्धांजली दिल्याचे सार्थक होईल, असे हुतात्मा स्मारक समितीकडून बोलेले जात आहे.येथे २६५ दिग्गज झालेत नतमस्तकदरवर्षी शहीद स्मृतिदिनी (नागपंचमी) शहीदांना श्रद्धांजली अपर्ण केली जाते. या कार्यक्रमाला देशातील दिग्गज मंडळी आष्टीत येतात. आतापर्यंत तब्बल २६५ दिग्गज लोकांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्यासह असंख्य केंद्रीयमंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, कवी, लेखक आणि प्रतिष्ठित नागरिकांचाही समावेश आहेत.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमी