शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील गहू पेटविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:35 IST

आॅनलाईन लोकमतघोराड : शेतात काढणीच्या स्थितीत असलेला गहू अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घोराड लगतच्या जुनगड येथे घडली. या आगीत शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची मागणी या पिडीत शेतकºयाने केली आहे.जुनगड येथे लिला पंजाब नेहारे यांचे ...

ठळक मुद्देएक एकरातील गव्हाचा कोळसा : ३५ हजारांचे नुकसान

आॅनलाईन लोकमतघोराड : शेतात काढणीच्या स्थितीत असलेला गहू अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घोराड लगतच्या जुनगड येथे घडली. या आगीत शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची मागणी या पिडीत शेतकºयाने केली आहे.जुनगड येथे लिला पंजाब नेहारे यांचे शेत आहे. त्यांनी यंदाच्या रबी हंगामत या शेतात पेरणी केली. गहू काढणीच्या स्थिती आला होता. सध्या मजुरांची कमतरता असल्याने मजूर मिळताच गहू काढू, अशी अपेक्षा शेतकºयाने ठेवली होती. या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला आज सकाळी अचानक त्याच्या शेतातील गहू जळाल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्याने शेताकडे धाव घेऊन पाहणी केली असता सुमारे एक एकरातील गहू जळून खाक झाल्याचे समोर आले.हाताशी आलेला घास गेल्याने या शेतकऱ्याची आर्थिक कोेंडी झाली आहे. ही आग नेमकी कोणी लावली याचा शोध घेण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याला पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला गावकऱ्यानी दिल्याचे समजते. मात्र भीतीपोटी शेतकरी या तक्रारीकरिता टाळत असल्याचे सांगण्यात येत आहे.