शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:31 IST

परिसरात रोहित्र बसविण्यासाठी महापारेषणद्वारे होत असलेल्या कामादरम्यान थेट ट्रॅक्टर उभ्या पिकातून चालविण्यात आला.

ठळक मुद्देमहापारेषणची मनमर्जी : शेतकऱ्याला फटका

ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : परिसरात रोहित्र बसविण्यासाठी महापारेषणद्वारे होत असलेल्या कामादरम्यान थेट ट्रॅक्टर उभ्या पिकातून चालविण्यात आला. त्यामुळे उभ्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले असून याचा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.चिकणी शिवारामध्ये विजय देशमुख यांच्या शेतात नव्यानेच रोहित्र बसविले जात आहे. यासाठी बºयाच ेशेतकऱ्यांच्या शेतात खांब उभे करण्यात आले; पण महापारेषण कंपनीकडून सदर शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता हे काम पूर्णत्वास नेल्या जात आहे. रोहित्र बसवित असलेल्या शेताला लागून मोरेश्वर पारोदे यांचे शेत आहे. यांच्या शेतात गव्हाचे पीक उभे असताना सवंगणीला आलेल्या पिकातून थेट ट्रॅक्टर चालवून पिकाचे नुकसान करण्यात आले. खांब आणण्यासाठी ट्रॅक्टर येथे शेतातून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.खांब आणण्यासाठी उभ्या गव्हाच्या पिकातून ट्रॅक्टर चालविल्यामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.