शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींतून होणार सुसज्ज बसस्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:36 IST

येथील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर देवळीला नवीन बसस्थानक मिळत आहे. तीन कोटींतून देवळीचे नवीन सुसज्ज बसस्थानक निर्माण होत आहे. या इमारतीच्या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देरामदास तडस : वेतनवाढ देत कर्मचाऱ्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर देवळीला नवीन बसस्थानक मिळत आहे. तीन कोटींतून देवळीचे नवीन सुसज्ज बसस्थानक निर्माण होत आहे. या इमारतीच्या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला.अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, न.प. अध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, न.प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता बकाणे व महामंडळाचे वर्धा विभाग नियंत्रक राजेश अडोकार आदी यांची उपस्थित होते.याप्रसंगी खा. तडस म्हणाले की, संघर्षमय जीवनात यापूर्वी विद्यार्थी व युवकांचे नेतृत्व करताना देवळीचा बस थांबा व सुविधांसाठी अनेक आंदोलने केली. कारागृहात गेला; पण आज या विभागाचा खासदार म्हणून तीन कोटींतून तयार होणाºया अद्यावत नवीन बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. यासाठी राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी सहकार्य केले. ४० वर्षांपूर्वीचे हे बसस्थानक अत्यंत जीर्ण झाले होते. कधीही पडून अपघात होण्याची शक्यता होती. या सर्व बाबींची जाण ठेवून परिवहन मंत्र्यांनी पुढकार घेतला. देशस्तरावर या महामंडळाचे मोठे नाव आहे. शिवशाही बसद्वारे महामंडळाने आधुनिकरणाचा मार्ग स्वीकारला; पण या शिवशाही बसला मर्यादित न ठेवता त्याचा व्यापक उपयोग करून आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मतही खा. तडस यांनी व्यक्त केले. देवळी व इतर महत्त्वाच्या ठिकाणी शिवशाही बसचा थांबा द्यावा. महामंडळाच्या कर्मचाºयांना वेतनवाढ देत त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही त्यांनी केली.नवीन वास्तूचा शिलान्यास खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागतगीत संकेत बाभळे यांनी सादर केले. संचालन अरविंद बाभळे यांनी केले तर आभार विभागीय वाहतूक अधिकारी स्मीता सुतवणे यांनी मानले. कार्यक्रमाला न.प. सदस्य नंदू वैद्य, संगीता तराळे, मारोती मरघाडे, अब्दुल नईम, प्रकाश कारोटकर, माया वडेकार, डॉ. श्रावण साखरकर, शरद आदमने, सुरेश तायवाडे, माला लाडेकर, नरेश पाटील, सुधाकर देवपुजारी, शीतल गौंड, कर्मचारी व नागरिक हजर होते.आठ फलाट, तीन विश्रांतीगृह व पोलीस चौकीनवीन बसस्थानकामध्ये आठ फलाट, तीन विश्रांतीगृह, मिटींग हॉल, गार्डन, स्रॅक बार, पोलीस चौकी, कॅबीन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे राहणार आहे. परिसराचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून एक वर्षात हे बांधकाम पूर्ण होईल, असे विभाग नियंत्रक अडोकार यांनी सांगितले.