शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांनाही कल्याण केंद्राच्या सवलती

By admin | Updated: October 10, 2015 02:41 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील कापड उद्योग, विद्युत, परिवहन, आणि बँकांमध्ये कार्यरत कामगार कर्मचाऱ्यांसाठी

पुलगाव येथे नवीन कामगार कल्याण केंद्राचे उद्घाटनपुलगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील कापड उद्योग, विद्युत, परिवहन, आणि बँकांमध्ये कार्यरत कामगार कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक वितरण, शिशुमंदिर, शिवणवर्ग अशा योजना राबवित आहे. याला जोड देऊन आता संगणक प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन विदेशी भाषा शिक्षण आदी नवे उपक्रमही राबविले जात आहे. या कल्याणयोजनांचा लाभ हॉटेल, बार , दुकान आदी ठिकाणी करीत असलेल्या असंघटित कामगारांनाही मिळणार असल्याचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य प्रमोद मोहोड यांनी सांगितले.कापड गिरणी कामगारांना कल्याण योजनेच्या सवलती प्रदान करणारे शहरातील कामगार कल्याण केंद्र २००३ पासून बंद झाले होते. तब्बल १२ वर्षांच्या प्रयत्नानंतर नव्याने सदर केंद्र कार्यरत झाले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीषकुमार साहू तर अतिथी म्हणून मंडळाचे सदस्य रमेश सावरकर उपस्थित होते. जयभारत टेक्सटाईल्सचे महाव्यवस्थापक विजयकुमार लढ्ढा सहायक कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, परिवहन मंडळाचे डेपो मॅनेजर बालाजी भांगे, बी.ई.सी. फर्टीलायझर्सचे अमित डोंगरे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे रामेश्वर वाघ, गुणवंत कामगार पुरस्कृत अरविंद बाभळे, धनराज पटले आदी उपस्थित होते. कामगारांसाठी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी सत्यजीत चौधरी यांनी केले. संचालन व आभार सुषमा बाराहाते यांनी केले. पंचधारा रोडवर असलेल्या या केंद्रासाठी नगरपालिकेने जागा दिल्यास स्वत:च्या इमारतीच्या प्रस्ताव नियोजित असल्याचे कल्याण आयुक्त दाभाडे यांनी याप्रसंगी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)