शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर ते कन्याकुमारी किसान यात्रेचे हिंगणघाट येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण झाले. किसान यात्रा रात्री ८ वाजता नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोहचली. विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ...

ठळक मुद्देदेशभरातील नेते सहभागी : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर केली सडकून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण झाले. किसान यात्रा रात्री ८ वाजता नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोहचली. विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे ढोल ताशासहीत स्वागत केले.या स्वागताला विराचे पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे, गिरीधर राठी, प्रदीप नागपूरकर, राजेंद्र पाटील, शेतकरी नेते दिनेश वाघ, महेश माकडे, भारत पाटील, जयंत धोटे, बंटी रघाटाटे, अजय मुळे, रोहीत राऊत, गौरव खिराळे, गोकुल पाटील व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सहभागी शेतकरी नेत्यांची भाषणे झाली.शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. सर्व शेतमालाला आधारभूत किंमत एमएसपी सी २ अधिक ५० जाहीर झाली पाहिजे. डॉ. स्वामीनाथ आयोग लागू झाला पाहिजे तो पर्यंत हा लढा सुरु राहील, असे आवाहन सभेतील सहभागी शेतकरी नेत्यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला केले. या किसान अधिकार यात्रेत अभिमन्यु कोहर यांनी आतापर्यंतच्या एकाही सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही. सर्वच सरकारने शेतकºयांची फसवणूक केली. गुरूनामसिंह चंदूरी (हरियाना) यांनी शेतकऱ्यांनी आपला लढा तीव्र करावा. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, असे सांगितले. जगजीत सिंह (पंजाब) यांनी विदर्भात झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या त्या हत्या आहे, कारण आत्महत्या या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेल्या आहे असे सांगितले. हामीद मलीक (काश्मिर कुपवाडा), सुरेश खोथ (हरियाना), तामीळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांचे शेतकरी नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या सभेचे प्रास्ताविक विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष तथा पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे यांनी केले. शेतकºयांच्या आत्महत्या नंतर स्वामीनाथन आयोग गठीत करण्यात आला असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन गोपाल मांडवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव पडवे यांनी केले. या सभेला मंचावर गिरीधर राठी, प्राचार्य आर. के. पाटील, माजी प्राचार्य भारत पाटील, उपप्राचार्य गुडधे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवतळे, उपमुख्याध्यापक राऊत, पर्यवेक्षक वाघ, पडवे, बन्सोड, राजु चंदनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेला हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.