शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:32 IST

विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न : नियमित विद्युत पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे. शहरांमध्ये अद्याप भारनियमन सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘इमर्जंसी’च्या नावावर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.काही दिवसांत कोळशाचा पुरवठा थांबल्याने वीज निर्मितीवर विपरित परिणाम झाला. यामुळे महावितरणद्वारे लगेच ग्रामीण भागात भारनियमनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन वेळात महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे. यामुळे ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात सकाळी तीन तास, दुपारी वा रात्री तीन तास, असे भारनियमनाचे वेळापत्रक आहे; पण या व्यतिरिक्त अन्य वेळीही वीज पुरवठा खंडित केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. शहरांसाठी सध्या भारनियमन नाही, असे विद्युत कार्यालयांकडून सांगितले जात आहे. असे असले तरी दिवसातून एक-दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याशिवाय राहत नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.भारनियमन त्वरित बंद करा; व्यापारी संघटनेची मागणीआष्टी (शहीद) : शहरासह तालुक्यात दुपारी व रात्रीच्या वेळी प्रत्येकी तीन तास सक्तीचे भारनियमन केले जात आहे. याविरूद्ध आष्टी तालुका व्यापारी संघाने महावितरणच्या सहायक अभियंत्याला निवेदन देण्यात आले. यात त्वरित भारनियमन न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शहरात मागील १५ दिवसांपासून सतत भारनियमन सुरू आहे. सकाळी ३ तास, कधी दुपारी ३ तास तर रात्रीला ३ तास वीज खंडित केली जाते. सायंकाळी ५.१५ ते ८.१५ ही वेळ व्यापाºयांची व्यवसायाची वेळ असते. याच वेळेत भारनियमन केले जात असल्याने नुकसान होत आहे. आष्टीत कुठलाही मोठा उद्योग व व्यवसाय नाही. यामुळे व्यापारी आधीच अडचणीत आले आहेत. त्यात आता विजेचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ही वेळ त्वरित बदलण्यात यावी, शहरात भारनियमन बंद करावे, अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे. निवेदन देताना संघाचे अध्यक्ष अशोक विजयकर, उपाध्यक्ष अता खान, संजय शिरभाते, सचिव पवन अग्रवाल, शफी अहमद, प्रदीप गुप्ता, नरेश भार्गव, राजेश ठाकरे, धिरज वाडेकर, सागर सिनकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.