शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 82,685 व्यक्ती ठरतील कमकुवत दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला तरी काेविड व्हॅक्सिन हाच सध्यातरी खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक लस कितपत प्रभावी राहतील यावर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करीत असून नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बूस्टर डोस द्यावा लागेल, असे काही तज्ज्ञ सांगतात.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविडच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमायक्रॉन या प्रकराचा झपाट्यानेच प्रसार होतो. इतकेच नव्हे तर कोविडची तिसरी लाट ओमायक्रॉनमुळेच जिल्ह्यासह देशावर ओढावण्याची शक्यता आहे. अशातच कोविडची तिसरी लाट ओढावण्यापूर्वी वर्धा जिल्हा १०० टक्के व्हॅक्सिनेट होणे गरजेचे असून ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यावर कोविडची तिसरी लाट ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार ६८५ व्यक्ती कोविडशी लढा देताना कमकुवत दुवा ठरतील.जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला तरी काेविड व्हॅक्सिन हाच सध्यातरी खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक लस कितपत प्रभावी राहतील यावर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करीत असून नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बूस्टर डोस द्यावा लागेल, असे काही तज्ज्ञ सांगतात. पण केंद्रीय टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमायक्रॉनशी लढा देताना कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले व्यक्ती कोविड लढ्यात कमकुवत दुवा ठरतील असे स्पष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार ६८५ व्यक्तींनी आतापर्यंत कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हेच व्यक्ती कोविडच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तीत प्रकाराशी लढा देताना कमकुवत दुवा ठरणार आहेत. सध्याच्या कोविड संकट काळात जिल्ह्यातील हाच कमकुवत दुवा लवकरात लवकर १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पाऊल उचलण्याची तसेच कोरोनाची लस न घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने नजीकच्या केंद्रावर जावून कोविडची व्हॅक्सिन घेण्याची गरज आहे.

१ लाख ७६ हजार व्यक्तींची दुसरा डोस कडे पाठ-    कोरोना संकटाच्या काळात लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला पूर्णपणे व्हॅक्सिनेट म्हटले जाते; परंतु अद्यापही जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार १७ व्यक्तींनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या