शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारतोफा थंडावणार, मतांची जुळवाजुवळ सुरू

By admin | Updated: October 12, 2014 23:47 IST

सोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहे. दरम्यानच्या काळात कोणत्या उमेदवाराने नागरिकांवर छाप पाडली. याची गणिते जुळविणे सुरू झाले आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी विधानसभा मतदार संघात

राजेश भोजेकर - वर्धासोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहे. दरम्यानच्या काळात कोणत्या उमेदवाराने नागरिकांवर छाप पाडली. याची गणिते जुळविणे सुरू झाले आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी विधानसभा मतदार संघात एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहे.प्रत्येकाने आपापल्या परीने प्रचाराला गती दिली. प्रमुख राजकीय पक्ष कॉँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना, मनसे, बसपा उमेदवारांमध्ये प्रचारातही चांगली चुरस बघायला मिळाली. आर्वी आणि वर्धा मतदार संघात काही अपक्षांनीही प्रचारात चुरस निर्माण केल्याचे दिसून आले. कोणाचे पारडे जड, कोण कोणाला पटकणी देईल, कोणामुळे कोणाच्या मतांचे विभाजन होईल, कुणाला फायदा होईल, याचा सारीपाट मांडणे सुरू झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रचारातील चुरशीमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले. यासोबतच विविध राजकीय नेत्यांच्या सभा आणि त्यातून आरोप प्रत्यारोपांचे फडही रंगले. यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकील रंग चढला होता. या प्रचाराच्या रणधुमाळीत १३ दिवस कसे पालटले हे कळले सुध्दा नाही. काही उमेदवारांनी सिनेकलावंताना प्रचारात आणून जनतेचे मनोरंजन केले. ‘यांनाच बहुमताने विजयी करा’ हा आवाज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ऐकायला येत होता. ही रणधुमाळी सोमवारी थांबणार आहे. निवडणुकीच्या वातावरण निर्मितीत भर टाकणारे विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांचे प्रचार फलक काढले जाणार आहेत. निष्पक्षपणे व शांततापूर्ण वातावरणात निवडणूक व्हावी, या अनुषंगाने शासकीय यंत्रणा कामात गती घेणार आहे. मतदार राजाला निवडणुकांमध्ये सर्वोच्च स्थान असते. एकेका मताचे महत्त्व उमेदवाराला वाटू लागते, हे अमुल्य मत देण्याचा दिवस आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. वर्धेत तिरंगी लढतीचे चित्रगत १३ दिवसांपासून वर्धा मतदार संघात प्रचारात कमालीचे चढउतार बघायला मिळाले. जस जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तसतशी निवडणुकीला रंगत येत आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असली तरी शिवसेना, बसपा आणि इतरही राजकीय पक्ष प्रचारात सातत्य ठेवून आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान अपक्ष आमदार रिंगणात आहेत, तर काँग्रेसने पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे यांच्या मुलावर बाजी लावली आहे. सेलू तालुक्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. इतर राजकीय पक्ष शहरी भागातच प्रभावी प्रचार करताना दिसून आले. मनसे, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी हे पक्ष मतांची विभाजन करणार असे दिसून येते. एकूणच राजकीय पार्श्वभूमी विचारात घेता मतदार संघात अंतिम सामना भाजप, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमध्ये होणार असे चित्र आहे.