शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आगामी विधानसभेत २८८ जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:12 IST

अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर अभियानची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. आम्ही कुठलेही आंदोलन न करता मतदारांना त्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन करीत आगामी निवडणुकीत विधानसभेच्या २८८ जागा लढू, अशी माहिती लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.वाकुडकर पुढे म्हणाले, रविवारी सेवाग्राम येथे आमची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आम्ही या देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी दशेतील तरुण-तरुणींशी ६० महाविद्यालयात जावून संवाद साधला आहे. त्यांना आम्ही आमच्या अभियानाच्या आठ कलमी कार्यक्रमाची माहिती समजावून सांगितली आहे. सध्या भांडवलशाही, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी वाढत असल्याने आम्ही मतदारांपुढे शुन्य लोकशाही, गाव तेथे उद्योग, कृषी धर्म-कृषी संस्कृती, मोफत आरोग्य-शिक्षण, सामाजिक सरकार-सामाजिक उद्योग, एक गाव-एक परिवार, नवा भारत-युवा भारत व जलद न्यायालय- पारदर्शी न्याय हे विषय घेवून जाणार आहो, असे सांगितले.सर्वसामान्यांचे नेतृत्त्व करणाºया राजकीय क्षेत्रात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा जास्तीत जास्त समावेश असल्याचे दिसून येते. याला आळा घालण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालय-पारदर्शी न्याय ही संकल्पना घेवून मतदारांपुढे जाणार आहे. या संकल्पनेनुसार एखाद्या राजकीय पुढाºयावर असलेल्या खटल्याचा निकाल तीन वर्षात अपेक्षीत आहे. जिल्हा न्यायालय दोन वर्षात न्यायनिवाडा करेल. त्यावर अपील झाल्यास उच्च न्यायालय सहा महिन्यात प्रकरण निकाली काढेल. त्यावरही अपील झाल्यास सर्वोच्च न्यायालय त्यानंतरच्या सहा महिन्यात प्रकरणाचा न्याय निवाडा करेल, अशी संकल्पना आहे.परंतु, यासाठी न्यायालयांची संख्या व त्यामधील मनुष्यबळ वाढविणे गरजेचे राहणार असल्याचे यावेळी वाकुडकर यांनी स्पष्ट केले, सध्या आमच्याकडे सुमारे नवे २५ चेहरे मतदारांसमोर निवडणुकीच्या वेळी पर्याय म्हणून देण्यासाठी आहेत. परंतु, सहा महिन्यात यादी अद्यावत होईल, असेही यावेळी प्रा. वाकुडकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संजय वानखेडे, कौस्तुब कावळे, दगडू पडिले, महादेव मिरगे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.