शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही खुशाल ओढू सार्वजनिक ठिकाणी सिगारेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

राज्य सरकारने २००८ मध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मज्जाव करणारा कायदा आणला. परंतु, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हा कायदा कागदावरच सीमित राहिला आहे.  अनेक जण खुलेआम बिडी, सिगारेट पिताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, कारवाई होत नसल्यामुळे हा नियम बासनात गुंडाळून ठेवल्याचे दिसून येत आहे.  शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानबंदीचा निर्णय घेतला तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. राज्य सरकारने २००८ मध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मज्जाव करणारा कायदा आणला. परंतु, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हा कायदा कागदावरच सीमित राहिला आहे.  अनेक जण खुलेआम बिडी, सिगारेट पिताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.   

कारवाईचे अधिकार कोणाला?

शासन आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कोटपाअंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना तसेच पोलिसांना आणि अन्न व औषध विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहे. मात्र, अजूनही कुठेच अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही

कायदा कागदावरच अन्न व औषध विभाग आणि आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत करुन सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आता नितांत गरज आहे.

दंडासह शिक्षेचीही तरतूद -  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम ११६ अ नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. -  त्याच व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व अत्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजारांपर्यंंत दंड. भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २६९ अंतर्गत ६ महिने शिक्षा किंवा दंड, कलम २७० अंतर्गत २ वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम २७२ अंतर्गत सहा महिने शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे.

जिल्ह्यात एकही कारवाई का नाही?-  शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सर्रासपणे केले जात आहे. -  अशातच ज्या शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिलेले आहेत.-  हे विभाग सुस्त असल्याचे दिसून येत असून, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली ऐकिवात नाही हे विशेष. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Smokingधूम्रपान