शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आम्हा नसे कुणाची पर्वा न् भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

पावसामुळे जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. हे निसर्ग सौदर्य बघण्यासाठी नागरिकांनी रिधोरा, मदन उन्नई, पंचधारा, महाकाळी, निम्न वर्धा, बोरधरण व पवनार येथे गर्दी करायला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस ही गर्दी वाढून त्या ठिकाणी आर्ट्यापार्ट्याही रंगू लागल्या होत्या.

ठळक मुद्देबंदीतही शोधली संधी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात घरामध्ये राहून त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुक्त श्वास घेण्याकरिता पावसाळ्यात तुडूंब भरलेल्या जलाशयाकडे धाव घेतली. या ठिकाणी चांगलीच गर्दी वाढायला लागली होती. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जलाशयाकडे जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पण, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला संधी शोधून नागरिकांनी जलाशयावर जाऊन आपली हौस भागवून घेतली.पावसामुळे जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. हे निसर्ग सौदर्य बघण्यासाठी नागरिकांनी रिधोरा, मदन उन्नई, पंचधारा, महाकाळी, निम्न वर्धा, बोरधरण व पवनार येथे गर्दी करायला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस ही गर्दी वाढून त्या ठिकाणी आर्ट्यापार्ट्याही रंगू लागल्या होत्या. कोरोनाच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्धा उपविभागातील जलाशयावर जाऊन पाहणी केली. स्वातंत्र्यदिनी शनिवार आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने या दोन्ही दिवशी जलाशयांवर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता जलाशयावर जाण्यास मनाई करुन दंडात्मक कारवाई करण्यासोबतच वाहनही जप्त करण्याचे आदेश दिले. तरीही उत्साही नागरिकांनी या आदेशाकडे पाठ फिरवित स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे शुक्रवारी बºयाच जलाशयावर जाऊन आपली ईच्छा पूर्ण करुन घेतली. काहींनी जलाशयावरील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले तर काहींनी व्हाट्सअ‍ॅपचे स्टेटसही ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाच्या निर्देशाकडे डोळेझाक करणाºया या नागरिकांनी ‘आम्हा नसे कुणाची पर्वा न भीती’ असे कृतीतून दाखवून दिले आहे.पवनारमध्ये जत्रेचे स्वरूपपवनार येथील धामनदीवर नागरिकांची नेहमीच गर्दी पहावयास मिळते. या ठिकाणी असलेल्या बंधाºयावरुन पाणी वाहत असल्याने हे निसर्गसौदर्य बघण्यासोबतच पोहोणाऱ्यांचीही संख्या बरीच असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा होती. पण, सैराट झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी पवनार येथे चांगलीच गर्दी केली होती. या ठिकाणी नदीपात्रालगतच्या मार्गावर दोन्ही बाजुनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्येही गजबज दिसून आली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा