शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला श्रमातून आनंद घेता यावा

By admin | Updated: March 23, 2017 00:49 IST

आजच्या वेगाने बदलत्या जगात गती हा परवलीचा शब्द झालेला आहे. त्यातून येणाऱ्या ताणाचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होतो.

प्रभाकर पुसदकर : गुणवत्ता शाश्वती उपक्रमात कार्यप्रवणता कार्यशाळा वर्धा : आजच्या वेगाने बदलत्या जगात गती हा परवलीचा शब्द झालेला आहे. त्यातून येणाऱ्या ताणाचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होतो. आपण बदलत्या काळाची नवी तंत्रे व व्यवस्थापनाची योग्य सवय विकसित केली तर आपल्याला आपल्या दैनंदिन कामकाजातून आनंद घेता येतो, असे मत नई तालिम समितीचे प्रभाकर पुसदकर यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात गुणवत्ता शाश्वती कक्षाच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कार्यप्रणवता कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी साधन व्यक्ती म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन वसंत वाडिभस्मे, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. धनंजय सोनटक्के, विजय चौधरी, दिनेश भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या कामाची योग्य ती दखल घेवून तसेच त्यांना प्रेरणा देऊन व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांची कार्यप्रवणता वाढविता येते, असे ते पुढे म्हणाले. या अनुषंगाने पुसदकर यांनी काही कसोट्यांचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना करून दाखविले. आपल्यात असलेले अंगभूत गुण न लपविता त्याचा उपयोग आपल्या कार्यालयीन कामांना अधिक आनंददायी व उत्तमप्रकारे करून घेण्यासाठी करून घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यशाळा आयोजनाची भूमिका डॉ. सोनटक्के यांनी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश भगत यांनी तर आभार विजय चौधरी यांनी मानले. या कार्यशाळेत वर्धा शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आयोजनाला प्रमोद माथनकर, विनोद बावणे, राजू मुंजेवार, नरेश आगलावे, डॉ. अनिता देशमुख, डॉ. मालिनी वडतकर, डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. प्रतिभा ताकसांडे, डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. सोनाली सिरभाते, प्रा. अमोल घुमडे, डॉ. रेखा बोबडे, प्रा. मदनमोहन विश्वकर्मा यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)