लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे सर्वच ठप्प असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून विविध करांच्या माध्यमातून सरकारला मिळणारा महसूल देखील बंद झाला आहे. त्यामुळे शासनाची आर्थिक बाजू कमकुवत आहे. या संकटकाळात मदतीचा हात म्हणून अनेक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत केली आहे.जलसंपदा कर्मचारी पतसंस्थेकडून एक लाखाची मदतवर्धा : जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून ‘कोवीड १९’साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता एक लाख एक हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडे सुपूर्द केला. जलसंपदा सहकारी संस्था ही नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग नोंदवित असून संचारबंदी काळात शासनास मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे संस्थाध्यक्ष विश्वेश्वर कडू यांनी सांगितले. तर सोशल डिस्टन्स पाळून संस्था आपल्या सभासदांना सेवा देत आहे. सहकार चळवळीतील सहकारातील सामाजिक जबाबदारी या तत्वास अनुसरून कार्य करण्याची गरज अशा संकट काळात जाणवते असे ओंकार धावडे यांनी सांगितले. धनादेश देताना संस्थाध्यक्ष विश्वेश्वर कडू, कार्यलक्षी संचालक ओंकार धावडे, संचालक पा.रा. देहारकर, सरव्यवस्थापक अनिल मुंधडा यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री सहायता निधीकरिता मदतीचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST
शासनाची आर्थिक बाजू कमकुवत आहे. या संकटकाळात मदतीचा हात म्हणून अनेक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत केली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीकरिता मदतीचा ओघ
ठळक मुद्देकोरोना : विविध स्वयंसेवी संस्थांचे दातृत्त्व