शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:42 IST

निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देमुख्य कालव्याला पाणी सोडण्यास सिंचन विभाग असमर्थ

श्रीकांत तोटे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. म्हणूनच रब्बी हंगामाकरिता या धरणातून धामच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविली आहे. परिणामी या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या असंख्य शेतकºयांच्या रब्बी उत्पन्नावर पाणी फेरले आहे.महाकाळी धरणाच्या धाम नदी कालवा क्षेत्रामध्ये येळाकेळी ते शिरपूर या दरम्यान महाकाळ, मोधापूर, पवनार, केदारवाडी, कुटकी, खरांगणा (गोडे), करंजी (काजी), करंजी (भोगे) या गावांचा समावेश आहे. या परिसरातील जवळपास ४ हजार ५०० हेक्टर जमिन कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. यात खरीप आणि रब्बी पिकांचाही समावेश आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्केच पाऊस झाल्याने पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिक धोक्यात आले. पावसाअभावी सोयाबीनचे उत्पन्न ५ क्विंटलच्या आत आले आहे. या पिकांची भरपाई गहू व चना या पिकांतून भरुन निघेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु धरणात ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत २३ टक्के पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. याच धरणावरुन वर्धा शहरासह लगतच्या अकरा ग्रामपंचायतला पाणी पुरवठा केल्या जातो.त्यामुळे सिंचन विभागाने पाणी सोडण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.सिंचनाला फाटा, बागायतदार अडचणीतकालव्याचे पाणी आधी पिण्यासाठी, सिंचनासाठी व नंतर औद्योगिकरणासाठी अशा प्राधान्याक्रमाने द्यायचे असते. परंतु जेव्हा जलसाठा कमी असतो तेव्हा मात्र सिंचनालाच फाटा दिला जातो. नदीवरील लिफ्ट ईरिगेशनद्वारे शेतीला मिळणारे पाणीही बंद केले जाऊ शकते. या धरणातून वर्धा नगर परिषद, एमआयडीसी, वर्धा उत्तम गल्वा कंपनीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नदीला बंधारे बांधून पाणी अडविल्यामुळे नदीला पाणी असते. नदी शेजारी असलेल्या शेतकºयांनी नदीवरुन पाईप लाईन टाकून सिंचनाकरिता पाणी घेतलेले आहे. ३ हजार हेक्टर क्षेत्राला लिफ्ट ईरिगेशनद्वारे पाणी पुरवठा होतो. परंतु वीज वितरणमार्फत त्यांचा वीज पुरवठा बंद केला जाण्याची शक्यता असल्याने आता केळी, ऊस व फळबागायदार शेतकरीही अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.दोन वेळा तरी पाणी सोडावेदरवर्षी १५ दिवसांच्या अंतराने १५ नोव्हेंबर ३१ मार्च या कालावधीत सहा वेळा कालव्याला पाणी सोडले जायचे. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ व्हायची. परंतु या वर्षी रब्बी हंगामासाठी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे.त्यामुळे यावर्षी निदान दोन वेळा जरी पाणी सोडले तरी चना,गहू व मुगासारखे पिक घेता येईल व खरीपालाही फायदा होईल. अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.१५ नोव्हेंबरला आढावा बैठक असून त्यावेळी धरणामध्ये उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार निर्णय घेण्यात येईल. १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाण्याची आवश्यक पातळी कायम ठेवावी लागते. आजच्या परिस्थितीनुसार शेती सिंचनासाठी कालव्याला पाणी सोडण्याची शक्यता नाही. त्या बाबतीत १५ नोव्हेंबरनंतर सूचना देण्यात येईल.रवींद्र डाफणे, सह संचालक, जलसचिंन (कालवा) पिपरी (मेघे)