शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या कामांनी शिवार झाले जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:10 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे.

ठळक मुद्देजंगलातील नाले भरल्याने वन्यप्राण्यांची सोय : ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर झाले कामे

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे.पांजराबंगला, जसापूर, किन्हाळा, आजनडोह येथील नाल्यांना भरपूर पाणीसाठा संचयीत झाला आहे. जंगलात वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत होते. याची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. टाले यांनी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवून कामे उपलब्ध करून सुरू केली. यावर्षी २७ रुपये घनमीटर एवढा कमी दर असल्याने अनेक ठिकाणी निविदा होवूनही कामे प्रलंबित होती. मात्र तळेगाव वनविभाग यामध्ये यशस्वी ठरला. विविध निविदाधारक एजंसीला वनाधिकारी टाले यांनी गळ घालीत वन्यप्राण्यांसाठी ना नफा ना तोटा या धर्तीवर कामे करा असे आवाहन केले होते.त्यांच्या हाकेला ओ देत पोकलँड धारकांनी नाला खोलीकरण कामे करून दिली. त्यामुळे महिनाभरात झालेल्या पावसाचे पाणी यात साचले. सध्या नाल्याच्या काठावर दररोज सकाळी बिबट, हरिण, ससे, रोही, रानडुक्कर यासह विविध प्राणी पाणी पिण्यासाठी हजेरी लावत आहे. प्राण्यांना पाणी मिळाले असल्याचे समाधान टाले यांनी व्यक्त केले. यासोबतच वनतलाव सलग समतल चर, टिसीएम कामेही विविध बिटमधील मौजात करण्यात आल्याने जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यास मदत झाली आहे.यासह क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक, कर्मचारी, वनमजूर यांनी परिश्रम घेतले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू नुकतीच पाहणी करून गेली आहे. याच धर्तीवर इतरही ठिकाणी जलयुक्तची कामे यशस्वी करण्याचे वनविभागाने ठरविले आहे.शासनाने दिलेल्या निधीचा योग्य मार्गाने वापर करून नाला खोलीकरणासारखी कामे पूर्ण झाली आहे. वन्यप्राण्यांसाठी चांगली सोय झाली आहे.डी.एस.टाले, वनपरिक्षेत्र अधिकारी, तळेगाव (श्या.पंत.)

टॅग्स :forest departmentवनविभागJalyukt Shivarजलयुक्त शिवार