शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

आष्टीवासीयांची पाण्याकरिता भटकंती

By admin | Updated: March 12, 2016 02:21 IST

पाणी पुरवठा योजनेचे ४ लाख २० हजार रुपये थकल्याने अखेर वीज वितरण कंपनीने विद्यूत पुरवठा खंडित केला.

वीज कापली : पाणी पुरवठ्याचे ४.२० लाख थकलेआष्टी (शहीद): पाणी पुरवठा योजनेचे ४ लाख २० हजार रुपये थकल्याने अखेर वीज वितरण कंपनीने विद्यूत पुरवठा खंडित केला. यामुळे गत तीन दिवसांपासून शहरातील नळांना पाणी आले नाही. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. केवळ नगराध्यक्षांच्या हलर्गीमुळे उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत असल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला आहे.आष्टी शहरातील पाणी पुरवठा योजना गत १५ वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत होती. आष्टी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषद सोबत संबंध तुटला. जिल्हा परिषद विभागाने आष्टी नगरपंचायतीला पाणीपुरवठा योजना स्वतंत्र करण्याकरिता पत्रद्वारे कळविले होते. परंतु सदर पत्राची आष्टी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी दखल घेतली नाही. विद्युत विभागाचे गत सहा महिन्यांपासून थकीत असलेले वीज बिल भरण्याची काळजी सुद्धा घेतली नाही. २ मार्च २०१६ रोजी विद्युत विभागातर्फे आष्टी नगरपंचायतला थकीत वीज बिल भरण्याकरिता नोटीसही बजावण्यात आली होती. आष्टी नगरपंचायतच्या न.प. फंडामध्ये मुबलक पैसे असूनही नगरपंचायततर्फे वीज बिल भरण्यात आले नाही. विद्युत विभागाचे अभियंता यांनी नगराध्यक्षांशी संपर्क करून या प्रकराची माहिती त्यांना दिली. यावर त्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे उत्तर दिले. विद्युत विभागाने वीज पुरवठा खंडीत करण्याच्या आठ दिवसांपासून नगरपंचायतला पूर्व कल्पना दिली होती. तसेच भाजपाच्या नगरसेवकांनी याकडे लक्षही वेधले होते; परंतु तरीही नगराध्यक्षांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे अखेर आष्टी शहराच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा विद्युत विभागातर्फे खंडीत करण्यात आला. यावरुन आष्टी नगराध्यक्षांचा शहराप्रती बेजबाबदारापणा दिसत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पाण्याच्या या ज्वलंत प्रश्नावर भाजपा गट नेत अशोक विजयकर, अ‍ॅड. मनीष ठोंबरे, अजय लेकुरवाळे, सुरेश काळपांडे, निर्मला दारोकर, वंदना दारोकर, प्रमोद गुप्ता व शहर भाजपा कार्यक्रर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.(प्रतिनिधी)मायबाई वॉर्डात पाणी पेटलेआर्वी : येथील मायबाई वॉर्डात पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. ही मागणी मार्गी लावण्याकरिता तहसीलदारांना मागणीही करण्यात आली. असे असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. ही समस्या तात्काळ मार्गी न लागल्यास युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने कोरडा जल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मायबाई वॉर्ड येथील एका भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र होत आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाला याची माहिती देण्यात आली आहे; परंतु येथे कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. मायबाई वॉर्ड कसबा येथील जवळपास ३०० कुटुंब या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या वस्तीत गोरगरीब लोकांचे वास्तव्य आहे. येथील महिलांना जवळपास १ कि़मी. अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी आहे. अन्यथा १४ मार्च रोजी युवा स्वाभिमानतर्फे उग्र व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी न.पा. प्रशासनाची राहील, असे निवेदनातून कळविण्यात आले आहे. निवेदन देताना प्रवीण वानखेडे, गुड्डू सोनटक्के, रविंद्र वानखेडे, जितेंद्र अवचारे, बबन एस. गायकवाड, सचिन प्रधान, अनिल कांबळे, रवी लांडगे, अरूण लांडगे, सुनील लांडगे, आकाश पवार, संदीप प्रदान, नरेश बावणे, सागर वाघमारे, सुभाष लांडगे, विनोद प्रधान, प्रविण लांडगे, मंगेश लांडगे, अजय गायकवाड, शंकर प्रधान, गोलू लांडगे, विलास प्रधान, राहुल प्रधान, नरेश बावणे, स्वप्निल प्रधान, विलास लांडगे, कैलास लांडगे, रवी लांडगे, सागर लांडगे, रमेश राऊत, आकाश लांडगे, संजय लांडगे, विक्की लांडगे इत्यादी कार्यकर्ते हजर होते.आर्वी बसस्थानकावरही पाण्याची वानवाआर्वी येथील बसस्थानकाचे नव्याने बांधकाम केले. अमरावती, वर्धा व इतर ठिकाणी प्रवास करणारे हजारो प्रवाशी येथे ये-जा करतात पण पाण्याची सोय नसल्याने त्यांचे हाल होत आहे. सेवानिवृत्त एस.टी. चालक पुरूषोत्तम पुरोहित यांनी प्रवाश्यांना व कर्मचाऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता आर.ओ. फिल्टर मशिन दान केली. मशिन लागून एक महिना होत आहे. ती बस स्थानक प्रशासनाच्यावतीने अजूनही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाश्यांना व एस.टी. कर्मचाऱ्यांना पिण्याकरिता घरून पाणी आणवे लागते. बस वेळापत्रकापेक्षा उशिराच येत असल्याने प्रवाश्यांना एक दोन तास बसची प्रतीक्षा नित्याचीच झाली आहे. या काळात त्यांची पाण्याकरिता चांगलीच पंचाईत होते. नाईलाजाने पाण्याकरिता पैसे मोजावे लागते. बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी नसल्यामुळे प्रवाश्यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. एस.टी. प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते.