शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

देवळीतील मलकापूर झाले जलयुक्त

By admin | Updated: August 5, 2016 02:00 IST

पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतात शिरुन खरीप पीक नष्ट होत होते. एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला

५३७ दलघमी पाणीसाठा : शेतकऱ्यांनी केली डाळिंबाची लागवड वर्धा : पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतात शिरुन खरीप पीक नष्ट होत होते. एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला तरच रबी पिकाची शाश्वती मलकापूर गावातील शेतकऱ्यांना होती. पण जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या नाला खोलीकरणामुळे शेतात पाणी शिरण्यास पायबंद बसला आणि नाल्याकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले. कित्येक वर्षात ज्या शेतात खरीपाचे पिकच आले नाही, त्या शेतात सोयाबीन, कापूस व तुरीचे पीक आज डौलाने उभे आहे. देवळी तालुक्यातील मलकापूर हे गाव कायम टंचाईग्रस्त गाव. मागील वर्षी या गावाची आणेवारी ५० टक्केच्या आत होती. २०१५-१६ मध्ये या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आणि गावाचे चित्रच पालटले. गावाच्या एकूण पाण्याच्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सिमेंट नाला बांधासह नाला खोलीकरणाची सहा कामे, दोन साठवण बंधारे आणि पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोत बळकटीकरणासाठी भूमिगत रिचार्ज शाप्ट पाच अशी एकूण १३ कामे घेण्यात आली. त्यापैकी आठ कामे पूर्ण झाली असून पाच कामे प्रगतीपथावर आहे. गावाच्या एकूण वाटर बजेटींग नुसार ९१ टक्के पाण्याचे बजेटींग पूर्ण झाले आहे. सध्या गावात ५३७.६४ दलघमी पाणीसाठा असून या पाण्याचा उपयोग सुमारे ५३७ हेक्टराच्या सिंचनासाठी होणार आहे. या संपूर्ण कामासाठी १ कोटी ४६ लक्ष रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी पूर्ण झालेल्या कामावर ७० लक्ष ६७ हजार रुपये खर्च झाले आहे. जलयुक्त शिवारमधील झालेल्या कामामुळे विशेषत: नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतांना दिसत आहे. पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली. हे गाव कायम पाणी टंचाईग्रस्त होते. गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे; मात्र या योजनेसाठी वापरण्यात येणारी विहीर उन्हाळ्यात कोरडी व्हायची. त्यामुळे गावात पाणी पुरवठा होत नव्हता. जलयुक्त शिवारमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोत विहिरीजवळ रिचार्ज शाप्टची कामे करण्यात आली. यामुळे यावर्षी विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. पुढील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही अशी आशा आहे. - साधना नेहारे, सरपंच, मलकापूर नाल्यालगत माझी पाच एकर शेती असून शेतात विहीर आहे. मात्र रब्बी पिकाला विहिरीचे पाणी पुरत नव्हते. पण नाला खोलीकरणाचे कामामुळे यावर्षी विहिरीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे दोन एकरात मी डाळिंबाची लागवड केली आहे. पावसाळ्यानंतर विहिरीच्या पाण्यावर डाळिंब शेती जगवता येईल. - प्रशांत निवल, शेतकरी,मलकापूर