शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:48 IST

यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.

ठळक मुद्देपंकज भोयर यांचे निर्देश। अधिकाऱ्यांची घेतली निवासस्थानी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स.च्या सभापती जयश्री खोडे, वर्धा पं.स.च्या सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, अर्चना टोनपे, सायंकार, सरस्वती मडावी, राणा रणनवरे, पं.स. सदस्य अमित गावंडे, अशोक मुडे, प्रफुल्ल मोरे, चंदा सराम, दुर्गा ताजने, ज्योती टिपले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत, नायब तहसीलदार जाधव, तिनघसे, गटविकास अधिकारी इसाये, पाटील यांच्यासह सरपंच, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी पहिल्या व दुसºया टप्प्यात पाणी टंचाई संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाचा आढावा आ. डॉ. पंकज भोयर यांनी घेतला. मागील दोन वर्षात पर्जन्यमान कमी झाले असून उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगून जलस्त्रोत झपाट्याने कमी होत असल्याने पाणी समस्या गंभीर होत असल्याचे सरपंचांनी सांगितले. गावातील बोअरवेल, विहिरी आटत असून नैसर्गिंक जलस्त्रोत पूर्ण पणे आटले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. गावातील विहिरींचे खोलीकरण, नवीन विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणी पुरवठा याबाबीवर काम करण्यात यावे, अशी सूचना सरपंचानी केली. यावेळी आ. भोयर यांनी सर्वांच्या अडचणी जाणून घेत प्रत्येकासाठी पाणी महत्वाचे आहे. माणसासोबतच जनावरांना सुद्धा पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या. पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ती सोडविण्याला अधिकाऱ्यांनीही प्राथमिकता द्यावी.प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी समन्वय साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना केल्या. वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागासह पांढरकवडा पारधीबेडा येथील पाणी टंचाई बाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, अशा सूचना अधिकाºयांना आ. भोयर यांनी दिल्या. बैठकीला अशोक कलोडे, आशिष कुचेवार, विजय खोडे, वासुदेव देवडे, शुभंगी मुडे, संदीप पाटील, खोसे आदी हजर होते.जाणून घेतल्या गावातील समस्याआमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीदरम्यान वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आमदारांसमोर गावातील पाणीसमस्येचा पाढाच वाचला. यामुळे अधिकाºयांची मात्र तारांबळ उडाली.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरWaterपाणी