शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात पाणीटंचाई; ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: August 9, 2014 23:52 IST

उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला कंटाळलेल्या येथील नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे़ ग्रामपंचायत प्रशासन

रोहणा : उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला कंटाळलेल्या येथील नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे़ ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या किमान अपेक्षांचीही पूर्ती करू शकत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या रोहणा गावात प्रत्येक लहान-मोठी निवडणूक जिद्दीने लढली जात असे; पण कालांतराने हा परस्पर विरोध कमी होऊन सत्तेतून वृद्धांनी बाजूला व्हावे व युवकांच्या हातात सत्तेची चावी सोपवावी, ही मानसिकता वाढीस लागली़ परिणामी, गावात एकोपा निर्माण होऊन ग्रामपंचायत निवडणूक अविरोध पार पाडण्यात आली़ यात गावातील सुशिक्षित, राजकीय जाण असलेल्या राजकीय पक्षातील युवक, युवतींना ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले़ सत्तेची चावी तरुणांच्या हातात सोपविताना ग्रामस्थांना गावातील पाणीटंचाई, रस्त्यावरील अतिक्रमण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या सोडविल्या जातील, अशी अपेक्षा होती़ यासाठी त्यांना कार्यक्षम म्हणून लौकिक असणारा ग्रामविकास अधिकारी प्राप्त झाला; पण या तरूण चमूचा तीन चतुर्थांश काळ संपला असताना एकही समस्या सुटली नाही़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईने पावसाळ्यात त्यापेक्षा भयानक रूप धारण केले आहे़ मागील १० दिवसांपासून गावात नळाला पाणी येणे बंद आहे़ नळ योजनेतील विद्युतचे दोन्ही मोटरपंप जळाल्याचे कारण पूढे केले जात आहे़ वास्तविक, एक मोटर पंप जळाला तर दुसरा अतिरिक्त मोटर पंप उपलब्ध ठेवणे प्रशासनाचे कर्तव्य आहे़ मोटर दुरूस्तीला दहा दिवस लागतात़ ही बाब प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची परिसीमा आहे़ नदीला पाणी आहे़ नळयोजनेच्या विहरीत जलसाठा आहे़ विद्युत वितरण कंपनीने भारनियमन बंद केले आहे़ असे असताना ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे गावात ग्रा़पं़ प्रशासनाविरूद्ध नाराजी दिसून येत आहे़ अनेक ग्रामस्थ युवकांच्या हाती सत्ता देऊन आपली फसगत झाल्याची भावना व्यक्त करतात़ काही तरूण सदस्य तर कधीच मासिक सभेला हजर राहत नसल्याची माहिती आहे़ अशा सदस्यांनी राजीनामा देत दुसऱ्या तरूणाला संधी देणे गरजेचे आहे़ उर्वरित कालावधीत पाणीटंचाई जाणवू नये म्हणून शक्य प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)