शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट नाल्याअभावी पाणी तुडूंब

By admin | Updated: July 30, 2016 00:33 IST

सिंदी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक १ येथील अंगणवाडी परिसरातील नाली तुंबली आहे.

आरोग्य धोक्यात : सिंदी(मेघे) ग्रा.पं. च्या वॉर्ड क्रमांक १ मधील प्रकार वर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक १ येथील अंगणवाडी परिसरातील नाली तुंबली आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असून दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहे. सांडपाणी घरासमोर साचत असून यात डासांची उत्पत्ती होऊन रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची प्रत पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय येथे देण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्यांकडे, तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यआ तक्रारीतून आला आहे. वारंवार येथील नाली साफ करण्याची मागणी केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. नाली तुंबली असल्याने विद्यार्थ्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सांडपाणी वाहुन जाण्यासाठी सिमेंट नालीची व्यवस्था करावी, अशी मागणी मनोरमा शंभरकर यांनी निवेदनातून केली आहे. वार्ड नं. १ मधील रहिवासी शंभरकर यांच्या घरासमोर सांडपाण्याचा प्रश्न गत कित्येक वर्षांपासून थंड बस्त्यात आहे. शिवबा व दिंगाबर लांबे यांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर साचून राहाते, याबाबत तक्रारी करूनही गखामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोप शंभरकर यांनी केला आहे. ज्या भागात रस्त्यावर पाणी साचत आहे त्या भागात एक अंगणवाडी आहे. या अंगणवाडीत आज जवळपास २० ते २५ लहान मुले येतात. या पाण्यामुळे ही लहान मुले पाय घसरून पडतात. मुलेच नाही तर वॉर्डातील नागरिकही येथे येवून पडतात. नालीत तुंबलेल्य पाण्यामुळे डास, जलजंतू याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होवून विद्यार्थ्यांना व परिसरातील नगारिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना एखाद्या आजाराची लागण होण्याची शक्यात आहे. शिवाय या पाण्यामुळे येथे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाची राहील, असे शंभरकर यांनी कळविले आहे. सरपंच, वॉर्डातील सदस्य, ग्राम विकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती दिली असता केवळ स्थळ निरीक्षण करून लवकरच काम करण्यात येईल असे आश्वासन देवून मोकळे झाले. येथील नालीचे बांधकाम करून सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत योग्य उपाय योजना करून आम्हा परिसरातील नागरिकांना व न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)