शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर जलसंकट, भाजीपाला पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:07 IST

यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देउन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.चिकणी येथील अल्पभूधारक शेतकरी विजय डायरे यांनी ओलिताखाली असलेल्या एक एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली होती. लागवडीकरिता त्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. यामध्ये त्यांनी वांगी, मिरची, कांदा, लसूण, मेथी आदी भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु, ऐन फेब्रुवारीतच विहिरीचे पाणी आटल्यामुळे पिकांना ओलिताची समस्या निर्माण आणि पीक करपले. यात डायरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.पाणी... जपूनच!शहरासह लगतच्या ११ गावांतील नागरिकांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात नागरिक पाण्याची अनावश्यक नासाडी करीत आहे. रस्त्यावर सकाळी व सायंकाळी नळाद्वारे पाणी मारत आहे. तसेच घराशेजारी वाहने धुण्याचे काम केले जात आहे. अनेक जण पाणी चक्क नाल्यांमध्ये सोडून देतात. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा जपूनच वापर करावा, असे आवाहन सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.पाणीपातळीत झपाट्याने घटयावर्षी जिल्ह्यात ७७ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट अतिशय तीव्र स्वरूपात राहणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच अनेक भागात विहिरींची पातळी खोल गेली आहे. शेतातील मोठ्या विहिरींच्या पाणी पातळीतही घट झाली असून शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने अनेक नागरिकांनी बोअरवेल तयार केल्या. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी तयार केलेल्या बोअरवेलचीही पातळी खोल गेली आहे. काही ठिंकाणी बोअरवेल कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात वर्धा जिल्ह्यावर तीव्र पाणी संकटाची छाया पसरली आहे.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नचिकणीसह परिसरात यापूर्वी एप्रिल, मे महिन्यात विहिरींचे पाणी आटत असे. अल्प पर्जन्यमानामुळे यावर्षी मात्र फेब्रुवारीमध्येच विहिरी कोरड्या ठाक झाल्या आहेत. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले असतानाच पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. प्यायलाच पाणी नाही, तर पिकांना ओलित करण्यासाठी पाणी आणायचे तरी कोठून असा प्रश्नपरिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.शेतात गहू, आणि हरभऱ्याची सप्टेंबर महिन्यातच लागवड केली होती. त्यामुळे ही पिके जोमात बहरले आणि बºयापैकी उत्पन्नही घेता आले.- विजय डायरे, शेतकरी, चिकणी (जा.).