शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्याला पाण्याचे ग्रहण

By admin | Updated: July 29, 2016 02:10 IST

शहरालगतच्या हनुमान टेकडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून निघालेले अशुद्ध पाणी...

संबंधित विभागाचे दुर्लक्ष : प्राधिकरणच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल वर्धा : शहरालगतच्या हनुमान टेकडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून निघालेले अशुद्ध पाणी सतत मुख्य रस्त्यावरून वाहते. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गांधी सिटी पब्लिक स्कूल समोर तर चिखलाचे साम्राज्यच निर्माण झाले आहे. तीनही ऋतूमध्ये वाहणारे हे पाणी नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहे. प्राधिकरणने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक तसेच गांधी सिटी पब्लिक स्कूलकडून करण्यात येत आहे. हनुमान टेकडीवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून सायंकाळच्या सुमारास दररोज अशुद्ध पाणी बाहेर फेकले जाते. हे पाणी टेकडीवरून खाली उतरून मुख्य रस्त्याच्या बाजूने वाहत असल्याने परिसर चिखलमय होतो. परिणामी, नागरिकांना तसेच चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागतो. गांधी सिटी पब्लिक स्कूलसमोरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच परिसरातून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. वर्षभर वाहणाऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. यात वाहने रूतत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पाणी आणि चिखलामुळे व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत. याबाबत पिपरी (मेघे) ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)