शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सदोष बांधकामामुळे पाण्याची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:08 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते.

ठळक मुद्देमोझरीच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिले पाणी सतत २२ दिवस सोडण्यात आले. परंतु यातील एकही दिवस पाणी मोझरी (शेकापूर) या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. कालव्याला पाणी सोडल्याच्या दिवसापासून साठ तासात पाणी मोझरी या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड, खानगांव या गावात पोहचले. तसेच सर्वच दिवस आवश्यकतेपेक्षाही जास्त पाणी पुरवठा या गावांमध्ये झाला. पण, मोझरीपर्यंत पाणी का येत नाही, या पाठपुरावा शेतकºयांनी केला असता खानगाव ते कापशी दरम्यान कालव्याचा पुर्ण उतार काढला नाही तसेच कालाव्याची रुंदी व लांबी याचा ताळमेळ जुळलेला नसल्याचे आढळून आले. म्हणूनच हा कालवा पूर्ण झाल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत पाण्याचा एकही थेंब मोझरीवासीयांच्या नशीबी आला नाही. त्यामुळे या कालाव्याच्या बांधकामाची चौकशी करुन मोझरीतील शेतकऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देताना संदिप वरखडे, प्रवीण वनकर, खेमचंद चिमणे, संदेश उमरे, परशांता मुंजेवार, गजानन काकडे व सुरेश पारिसे उपस्थित होते. या निवेदनावर गावातील ५८ जणांच्या स्वाक्षरी आहेत. या निवेदनाच्या प्रतिलीपी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, निम्न वर्धा कार्यालय, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, वर्धा पंचायत समितीचे बांधकाम सभापती यांनाही देण्यात आले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.अधिकाऱ्यांकडून होतेय टाळाटाळनिम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर कालव्याने ते मोझरी (शेकापूर) गावापर्यंत पोहचत नाही. सोडलेले पाणी मोझरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये भरपूर प्रमाणात उलब्ध होते. यासदर्भात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता धरणात पाणी उपलब्ध नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नाही, अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जर धरणात पाणी नाही तर बाकी गावांना पाणीपुरवठा कुठून होतो, असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकºयांनी पाणी न येण्यामागचे कारण शोधून काढले. तेव्हा कालव्याचे बांधकामच सदोष असल्याचे आढळून आले.