शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फोडली पालिकेचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:00 IST

दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : खासदारांकडून कंपनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.जलवाहिनी फुटल्याने देवळीचा पाणी पुरवठा दहा दिवसांसाठी प्रभावीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडस घटनास्थळ गाठून पाहणी केली. परिस्थिती एकदम विदारक असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी असलेल्या जेसीबीची चाबीच त्यांनी घेऊन घेतली. शिवाय सुरू असलेले काम बंद पाडून घटनेची माहिती फोनवरून देवळीच्या ठाणेदारांसह पोलीस अधीक्षकांना दिली. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दिलीप बिल्डकॉनचे विभागीय मॅनेजर गिरीष तलवार यांच्यांशी मोबाईलवर संपर्क साधून रोष व्यक्त केला. दरम्यान न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी देवळी पोलीसात तक्रार दिली आहे. त्यातून गैरअर्जदारावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.दहा दिवस मिळणार नाही पाणीअंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना गेल्या ५० वर्षांपासून कार्यान्वित आहे; पण कालांतराने ही योजना तांत्रिक दृष्ट्या नादुरूस्त ठरल्याने नव्याने ३५ कोटींच्या निधीतून अद्यावत अशी पाणी पुरवठ्याची योजना उभी राहिली. मात्र, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कामगारांकडून काम करताना ही जलवाहिनी फोडली. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवळीच्या यशोदा नदीजवळील मुख्य जलवाहिनी फोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. परिणामी, पुढील ८ ते १० दिवसांपर्यत देवळीचा पाणी पुरवठा बंद राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.