शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:59 IST

दिवसाच्या पहिल्या ठोक्यालाच सेलू तालुक्यातील दिंदोडा आणि हिवरा ग्रामवासीयांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेकरिता संपूर्ण गावाने एकत्र येत मोठ्या उत्साहाने जलदेवतेची पूजा तसेच श्रमदान करून सुरुवात केली.

ठळक मुद्देदिंदोडा व हिवरा गावातून सुरुवात : बाराचा ठोका पडताच श्रमदानासाठी एकवटले गावकरी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ८ एप्रिल, दिवसाच्या पहिल्या ठोक्यालाच सेलू तालुक्यातील दिंदोडा आणि हिवरा ग्रामवासीयांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेकरिता संपूर्ण गावाने एकत्र येत मोठ्या उत्साहाने जलदेवतेची पूजा तसेच श्रमदान करून सुरुवात केली.रात्रीचे १२ म्हणजे गावामध्ये शुकशुकाट असतो; परंतु ८ एप्रिलची रात्र म्हणजे गावामध्ये जल्लोष बघायला मिळाला. गावामधील प्रत्येक नागरिक आपापल्या घरातील कुदळ, फावडे घेऊन गाव पाणीदार करण्याचा दृढ निश्चय करून तेथे उभा असल्याचा प्रत्यय त्यावेळी आला. या ग्रामस्थांना साथ देण्यासाठी शहरातूनही मंडळी मोठ्या संख्येने आली होती.त्यामध्ये प्रामुख्याने सेवाग्राम रुग्णालयातील डॉ. उल्हास जाजू, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रदीप सुने, डॉ. राजेश सरोदे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, प्रा. श्याम भेंडे, सचिन गरपाल, अनंत बोबडे, लोहे आदी उपस्थित होते.दिंदोडा गावामध्ये जलदेवतेची तसेच यंत्र सामग्रीची पूजा करण्यात आली आणि ‘जल है तो कल है’ यांसारखे जलजागृतीचे नारे देत श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. तसेच हिवरा या गावामध्ये संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन यंत्रसामग्रीची पूजा गावातील महिला आणि चिमुकल्यांकडून प्राधान्याने करून घेऊन नंतर दुष्काळरूपी राक्षसाच्या पुतळ्याचे गावातील चौकात दहन करण्यात आले. यावर्षी आपले गाव दुष्काळमुक्त करण्याची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली.तसेच संपूर्ण गावाने गावानजीकच्या शेतात कंटोर टाकून श्रमदान केले. उपस्थित लोकांना डॉ. उल्हास जाजू तसेच वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फाऊंडेशन समन्वयक चंद्रशेखर तसेच गावातील प्रशिक्षित तरुणांनी विशेष श्रम घेतले.मागीलवर्षी पाणी फाउंडेशनअंतर्गत आर्वी तालुक्यातील दोन गावांना पुरस्कार मिळाला. आपल्याही गावाला पुरस्कार मिळावा, पाणी समस्या कायमचे निकाली निघावी, गाव पाणीदार व्हावे याकरिता ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. यात युवकांसह महिला आणि पुरुषांचाही सहभाग असून त्यांनी पुरस्कार मिळविण्याचा निर्धार केला आहे.